सद्भावना रॅली, चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 09:52 PM2018-02-02T21:52:56+5:302018-02-02T21:53:23+5:30

नगर परिषद तुमसरच्या १५० वर्षपुर्ती निमित्त आयोजित सहा दिवसीय महोत्सव अंतर्गत गुरूवारला सकाळी सद्भावना रॅली व दुपारच्या वेळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Goodwill Rally, a spontaneous response to the painting competition | सद्भावना रॅली, चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सद्भावना रॅली, चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next
ठळक मुद्देतुमसर नगर परिषदेचा उपक्रम: विजेत्या स्पर्धेकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव होणार

आॅनलाईन लोकमत
तुमसर : नगर परिषद तुमसरच्या १५० वर्षपुर्ती निमित्त आयोजित सहा दिवसीय महोत्सव अंतर्गत गुरूवारला सकाळी सद्भावना रॅली व दुपारच्या वेळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सुभाष पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली सद्भावना रॅली आयोजन करण्यात आलेले होते. शेकडो युवक युवतींनी दौड लावून सद्भावनेचा संदेश दिला. उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, अशोक भोंगाडे, गणेश बर्वे, देवचंद सानेकर आदी उपस्थित होते.
नगर परिषद तुमसला १५० वर्षपूर्ण झाल्या निमित्ताने २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे भाग म्हणून विद्यार्थ्यांकरीता चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
शेकडो बालकांनी स्पर्धेत सहभाग घेवून रंगांचा मनमोक्त आनंद रेखाटला. चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या अध्यक्षतेखाली माजी नगराध्यक्ष जगदिशचंद्र कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आला. सद्भावना दौड तथा चित्रकला स्पर्धेत क्रमांक पटकाविणाºया स्पर्धेकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येणार आहे, हे विशेष.

Web Title: Goodwill Rally, a spontaneous response to the painting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.