गोपाळ समाजाने ठेवला आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:05 PM2018-04-03T22:05:26+5:302018-04-03T22:05:26+5:30

उच्चभ्रू श्रीमंत आणि सुविद्य म्हणविणाऱ्या समाजातील अनेक कुटुंबात आजही विवाह करताना हुंडा घेण्याची पद्धत आहे. हुंडा घेत नसल्याचे सांगून मानपानाच्या नावाखाली रोकड व दागदागिने मागितले जातात.

The Gopal community has kept the ideal | गोपाळ समाजाने ठेवला आदर्श

गोपाळ समाजाने ठेवला आदर्श

Next
ठळक मुद्देनाते माणुसकीचे : नवरीकडील आर्थिक खर्च केला वहन

संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : उच्चभ्रू श्रीमंत आणि सुविद्य म्हणविणाऱ्या समाजातील अनेक कुटुंबात आजही विवाह करताना हुंडा घेण्याची पद्धत आहे. हुंडा घेत नसल्याचे सांगून मानपानाच्या नावाखाली रोकड व दागदागिने मागितले जातात. रोज कष्ट करून पोट भरण्याचा गोपाळ समाजातील नवरदेवांनी वधूकडील लग्नखर्चाचा भार स्वत: करून अनोखा आदर्श समाजासमोर निर्माण केला.
१ एप्रिलला साकोली येथील नागझिरा मार्गावरील गोपाळांच्या वस्तीत झालेल्या विवाह सोहळ्यात साकोलीवासीयांना हा विरळा व तितकाच सुखावणारा अनुभव आला. श्रावण शिवणकर यांची अनिल व सुनिल ही दोन्ही मुले विवाहबंधनात अडकली. वधू नयना ऊर्फ वच्छला ही त्याच वस्तीत राहते. तिचे पितृछत्र हरपले आहे. त्यामुळे घराची जबाबदारी तिच्या आईवर होती. तर चिमणटोला येथील प्रियंका हिच्या घरची परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे शिवणकर कुटुंबियांनी लग्नाचा संपूर्ण खर्च स्वत: करण्याची जबाबदारी स्वीकारली. शिवणकर व त्यांची दोन्ही मुले मजुरी करून घरी हातभार लावतात. आर्थिक परिस्थिती सधन नसतानाही त्यांनी घातलेला पायंडा आदर्श ठरला आहे. यावेळी साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत, नगरसेवक रवी परशुरामकर, पाथरीचे उपसरपंच सिंगनजुडे, कुंदा कोटांगले, प्रमिला राऊत, टिकाराम हटवार, संपत कापगते या विवाह सोहळ्यात सहभागी झाले होेते.

Web Title: The Gopal community has kept the ideal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.