गोशाळांमुळे अनेक जनावरांना मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:40+5:302021-06-17T04:24:40+5:30

लाखनी : तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथे २००९ मध्ये काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन मातोश्री गोशाळेची स्थापना करण्यात ...

Goshalas have given life to many animals | गोशाळांमुळे अनेक जनावरांना मिळाले जीवनदान

गोशाळांमुळे अनेक जनावरांना मिळाले जीवनदान

Next

लाखनी : तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथे २००९ मध्ये काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन मातोश्री गोशाळेची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून गोवंश सेवा, गोसंवर्धन व गोसंगोपनाचे कार्य अविरत सुरू आहे. गोशाळांमुळे कत्तलीसाठी जाणाऱ्या अनेक जनावरांना जीवनदान मिळाले आहे. शासनाचा निधी नसताना केली जाते जनावरांची सेवा जिल्ह्यातील आदर्श गोशाळाशासनाचा निधी नसताना जनावरांची सेवा केली जात असून, जिल्ह्यातील आदर्श गोशाळा म्हणून नावलौकीक आहे.

गाईपासून मिळणारे शेण, गोमूत्र, दूध, दही, ताक, तूप आदींपासून औषधी, गांडूळ खत, गोमूत्र अर्क, जीवामृत इत्यादी तयार करून, सेंद्रिय शेती प्रशिक्षण, तसेच सुधारित गोठा जनावरांना सुधारित चारा वैरण या विषयाचे मार्गदर्शन केले जाते.

गोवंशाकरिता आदर्श गोळा, चारा साठवणगृह, प्रशिक्षण हॉल, चारा कटाई यंत्र, गोबरगॅस संयंत्र व गोरक्षकाला राहण्याकरिता मकान तयार केले आहे. पोलीस विभागाकडून पकडण्यात आलेली कत्तलीसाठी जाणारी जनावरे गोशाळेत दाखल केले जातात. त्याचे पशुधन विकास अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केला जातो. काही जनावरे अति दाटीने भरल्यामुळे गुदमरून मरून जातात, तर काही जनावरे जखमी असतात. मरण पावलेल्या जनावरांचे मृत्यू प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांमार्फत घेतले जाते. काही जनावरे कोर्टाच्या आदेशानुसार परत केले जातात. शेती उपयोगी जनावरे शेतकऱ्यांना हमीपत्रावर दिले जाते. नियमानुसार सर्व सुरू असून, याबाबत वार्षिक ऑडिट केला जातो.

मातोश्री गो शाळेचे विश्वस्त मंडळ हे सेवाभावी व सक्रिय मंडळ असून, भंडारा जिल्ह्यात एक आदर्श गोशाळा म्हणून नावलौकिक आहे. महाराष्ट्र शासनाने गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेकरिता निवड केली असून, या गोशाळेला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

Web Title: Goshalas have given life to many animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.