शासन शेतकऱ्यांचे हित जोपासते

By admin | Published: June 8, 2017 12:28 AM2017-06-08T00:28:07+5:302017-06-08T00:28:07+5:30

शेतामध्ये जलसिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात व्हाव्या यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहिरी खोदणे, जलशिवाराच्या माध्यमातून पाण्याचा संचित साठा वाढविण्यात येत आहे.

Governance attracts farmers' interest | शासन शेतकऱ्यांचे हित जोपासते

शासन शेतकऱ्यांचे हित जोपासते

Next

राजकुमार बडोले : शिवार सभांमधून ग्रामस्थांशी हितगूज
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : शेतामध्ये जलसिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात व्हाव्या यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहिरी खोदणे, जलशिवाराच्या माध्यमातून पाण्याचा संचित साठा वाढविण्यात येत आहे. एकंदरीत मागील अडीच-तीन वर्षामध्ये सरकारने राबविलेल्या लोकोपयोगी योजनामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचा निश्चित हित जोपासला जाणार असा आशावाद राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
पंडित दिनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनांतर्गत भाजपा सरकारने केलेल्या कामाची माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी शिवार सभांच्या माध्यमातून इंझोरी, निमगाव येथील ग्रामस्थांशी हितगूज साधतांना बडोले े बोलत होते. ते पुढे म्हणाले, गावातील शेवटच्या टोकावरील गरजू लाभार्थी कोणत्याही शासकीय योजनापासून वंचित राहणार नाही. गावखेड्यातील गरिबातला गरीब व्यक्ती विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना विस्ताराने गावपातळीवरील सामान्य माणसाच्या दारापर्यंत जाण्यासाठी शर्र्तीेचे प्रयत्न केल्या जात आहे. शेतामध्ये काबाडकष्ट करणारा शेतकरी सशक्त होऊन कर्जपाशातून मुक्त होण्यासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून मदतीची साथ देत आहे. गावामध्ये पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. इंझोरी येथील भाजपाचे महासचिव लायकराम भेंडारकर यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाप्रसंगी ना. राजकुमार बडोले, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा रचना गहाणे, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, जि.प. सदस्या कमल पाऊलझगडे, विनोद नाकाडे, तालुका भाजपाध्यक्ष उमाकांत ढेंगे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, चत्रूभाऊ भेंडारकर, होमराज ठाकरे, केवळराम पुस्तोडे, संदीप कापगते यांची उपस्थिती होती.

Web Title: Governance attracts farmers' interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.