सरकारने केला शेतकरी, बेरोजगारांच्या स्वप्नांचा चुराडा

By admin | Published: May 30, 2017 12:23 AM2017-05-30T00:23:19+5:302017-05-30T00:23:19+5:30

वाढती बेरोजगारी, शेती व उद्योगांची पिछेहाट या पार्श्वभूमीवर मोदी सरकार तीन वर्षांचा जल्लोष साजरा करीत आहे.

Government made farmers, unemployed youths scam | सरकारने केला शेतकरी, बेरोजगारांच्या स्वप्नांचा चुराडा

सरकारने केला शेतकरी, बेरोजगारांच्या स्वप्नांचा चुराडा

Next

बंडूभाऊ सावरबांधे : भंडाऱ्यात काँग्रेसचे धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वाढती बेरोजगारी, शेती व उद्योगांची पिछेहाट या पार्श्वभूमीवर मोदी सरकार तीन वर्षांचा जल्लोष साजरा करीत आहे. शासनाने शेतकरी व बेरोजगारांच्या स्वप्नांचा चुराडा केला. देशातील बंधुभाव पायदळी तुडवून देशाला मागे नेण्याचे काम हे केंद्र व राज्य शासन करीत आहे, असा आरोप माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांनी केला.
शासनच्या निषेधार्थ येथील त्रिमूर्ती चौकात काँग्रेसच्यावतीने आयोजित आंदोलनात ते बोलत होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शाश्वत विकासाचे फसवे गाजर दाखवून देशभरातील जनतेचा मोदी सरकारने भ्रमनिरास केला आहे. मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे निषेध केला.
देशातील नागरिकांना भूलथापा देऊन केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले. हे सरकार सत्तेवर येऊन तीन वर्ष झाले. परंतु, निवडून येण्यापूर्वी मोदी यांनी जनतेला जी आश्वासने दिली, ती आश्वासने पूर्ण होऊ शकलेली नाही. शेतकरी दररोज आत्महत्या करीत असून महागाई वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा भारतीय जनता पक्षवरील तसेच सरकारवरचा विश्वास उडाला आहे. भाजप सरकार नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. येत्या काळात जनता भाजपला धडा शिकवेल, असे मतही उपस्थितांनी व्यक्त केले.
निवेदन देताना माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रमोद तितिरमारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, मनोहर सिंगनजुडे, सभापती विनायक बुरडे, धनराज साठवणे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, माजी नगराध्यक्ष अमर रगडे, शंकर राऊत, भूमेश्वर महावाडे, सभापती नीलकंठ कायतें, जिल्हा परिषद सदस्य प्रेम वणवे, अनिक जमा पटेल, गणेश निमजे, महेंद्र निंबार्ते, नगराध्यक्ष स्वाती निमजे, मंगेश हुमने, भावना शेंडे, छाया पटले, जनार्धन निंबार्ते, दिनेश बोंदे्रे, प्रा मारबते, प्रीती बागडे, मिसाराम चोपकर, स्नेहल रोडगे,प्रवीण भोंदे, लांजेवार, आशिष पात्रे, जि.प.सदस्य के.के.पंचबुद्धे, एस टी गिऱ्हेपुंजे, अश्विन नाशिने, संजय वरगंटीवार, अरुण श्रीपाद, सुषमा वरगंटीवार, दिनेश गिऱ्हेपुंजे, सचिन फाले, विवेक गायधने उपस्थित होते. संचालन महेंद्र निंबार्ते यांनी तर आभारप्रदर्शन अजय गडकरी यांनी केले.

Web Title: Government made farmers, unemployed youths scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.