हरदोली येथील शासकीय धान खरेदी केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:54 PM2017-12-02T23:54:44+5:302017-12-02T23:55:03+5:30
खरेदी विक्री संस्थेच्या अखत्यारीत असणाºया हरदोली येथील गोडावूनच्या दारात शेतकºयांनी धानाची पोती विक्रीसाठी ठेवली आहेत.
आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : खरेदी विक्री संस्थेच्या अखत्यारीत असणाºया हरदोली येथील गोडावूनच्या दारात शेतकºयांनी धानाची पोती विक्रीसाठी ठेवली आहेत. या पोतींची सुरक्षा करणारी यंत्रणा नाही. यामुळे धानाची पोती चोरी होण्याची शक्यता आहे. शासकीय धान खरेदी केंद्र बंद असल्याची माहिती मिळाली आहे.
तुमसर -बपेरा राज्य मार्गावर असणाºया हरदोली गावात खरेदी विक्री संस्थेचे गोडावून आहे. या गोडावूनच्या प्रांगणात अनेक वर्षापासून शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी या गोडावूनच्या दारात धानाची पोती विक्रीकरिता ठेवत आहे. परंतु यंदा या गोडावूनच्या परिसरात शासकीय धान खरेदी केंद्राला मंजुरी देण्यात आली नाही. या शिवाय खरेदी विक्री संस्थेच्या अखत्यारीत असणारे गोडावून भाडे तत्वावर देण्यात आले नाही. यामुळे गोडावूनचे प्रवेशद्वारात असणारे धानाची पोती सुरक्षित नाही. हरदोली गावात शासकीय धान खरेदी केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. अन्य संस्थेला मंजुरी मिळाल्याने त्यांनी खासगी गोडावून भाड्याने घेतली असल्याने या खरेदी केंद्राची माहिती शेतकºयांना नाही. या संस्थेने १,४०० क्विंटल धानाची खरेदी केली असल्याची माहिती मिळाली आहे. या धान विक्रीचे चुकारे अद्याप शेतकºयांना प्राप्त झाले नाही. यामुळे चुकाºयासाठी शेतकºयांची ओरड सुरु झाली आहे. दरम्यान गोडावूनचे प्रांगणात उघड्यावर ठेवण्यात आलेल्या धानाची नासाडी सुरु झाली आहे. अनेक पोते नासधुस झाली आहे. उघड्यावर असणाºया धानाचे कुणी वाली नाही, असे वास्तव आहे. शेतकºयांनी ठेवलेल्या धानाची पोती सुरक्षित ठेवणारी यंत्रणा नाही. या गोडावूनचे प्रांगणात धान खरेदी केंद्र मंजुर नसल्याने ठेवण्यात आलेल्या धानाची पोती सुरक्षित करण्याचा प्रश्नच नाही, अशी माहिती मिळाली आहे. याशिवाय गोडावूनच्या प्रवेशद्वारात असणाºया धानाची पोती सुरक्षित करण्याची जबाबदारी शेतकºयाची असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीपासून शेतकरी अडचणीत आहे. विलंबाने धानाची रोवणी केली. धानाला मावा, तुडतुडा या रोगाने फस्त केले. थोड्याफार धानाची विक्री करण्यासाठी नेले असता या धानाला वाºयावर सोडण्यात आहे. धान खरेदी केंद्र बंद असल्याने खुल्या आभाळाचे छत्रछायेत असणाºया धान पोत्याची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. खासगी घरी धान खरेदी केंद्र सुरु असले तरी यासंदर्भात शेतकरी अनभिज्ञ आहेत. धानाचे खरेदी केंद्राचे स्थान बदलले आहे. संस्था नवीन आहे. यामुळे संस्थेने गावात जनजागृती करण्याची आवश्यकता असताना तसे प्रयत्न सुरु करण्यात आले नाही. अंदाजे ८०० ते ९०० धानाची पोती बेवारस सोडण्यात आली आहे. गोडावूनचे प्रांगणात धान खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. दिवस असताना धान खरेदी केंद्र संदर्भात शेतकरी माहिती काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु रात्री या पोत्यांची सुरक्षा कुणी करावी असा सवाल आहे. या गोडावून परिसरात धान खरेदी केंद्र धारकांनी माहिती व सूचना फलक लावले नसल्याने शेतकरी संभ्रमात असून तात्काळ धान खरेदी केंद्र सुुरु करण्याची मागणी होत आहे.
हरदोलीचे शासकीय धान खरेदी केंद्राचे संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. दारात असणारी धानाची नासाडी होत असल्याने प्रचंड नुकसान सोसावे लागणार आहे. या पोत्याचा तात्काळ मार्ग काढण्यात यावे.
-योगराज टेंभरे, तालुका महासचिव, शिवसेना, रनेरा
हरदोलीचे धान खरेदी केंद्रात बंद अवस्था आहे. फक्त १४०० क्विंटल धान खरेदी करण्यात आली असून चुकारे अडले आहे.
-बालू कटरे, युवा शेतकरी, हरदोली.