शासनाच्या योजना विद्यार्थ्यांसाठी आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:30 AM2018-05-09T01:30:37+5:302018-05-09T01:31:45+5:30
शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक बदल घडत आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी विविध साहित्यांची गरजा भागविणे आवश्यक ठरले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील क्रांती आधुनिक भारत घडवित आहे. यात शासनाच्या अनेक योजना विद्यार्थ्यांसाठी आधार ठरले आहे, असे मत सरपंच सुनिता तुरकर यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक बदल घडत आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी विविध साहित्यांची गरजा भागविणे आवश्यक ठरले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील क्रांती आधुनिक भारत घडवित आहे. यात शासनाच्या अनेक योजना विद्यार्थ्यांसाठी आधार ठरले आहे, असे मत सरपंच सुनिता तुरकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा अंजोरा येथे मानव विकास योजना व समाज कल्याण विभाग गोंदिया अंतर्गत विद्यार्थ्यांना सायकल वितरण कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ग्यानीराम राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सुनिता तुरकर, जियालाल पंधरे, मुख्याध्यापक डी.बी. भगत, श्यामराव उईके, सुभाष बिसेन, भूमिता रहांगडाले, केंद्र प्रमुख राधेशाम मेंढे, शालीकराम तलमले, अनिल बहेकार, चंद्रशेखर ब्राम्हणकर, शशीकला उरकुडे, ओमेश्वरी बिसेन, दिक्षा फुलझेले, सुलभा पाऊलझगडे, अनिता मानकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक डी.बी. भगत यांनी शाळा विकासाचा अहवाल सादर करीत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळा प्रगतीकारक पाऊल टाकत असल्याचे सांगितले. ग्यानीराम राऊत यांनी शासनाच्या नि:शुल्क सायकल वाटप धोरणामुळे मुलींच्या शिक्षणाला गती मिळाल्याचे सांगितले. जियालाल पंधरे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राधेशाम मेंढे, संचालन ओमेश्वरी बिसेन यांनी केले.