जुनी पेंशनच्या मागणीसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:16 AM2021-09-02T05:16:54+5:302021-09-02T05:16:54+5:30
जुन्या पेंशनबाबत आयोजित या सहविचार सभेचे प्रास्ताविक प्रा. जगदीश ब्राह्मणकर यांनी केले. सभेच्या आयोजनाचे महत्त्व याप्रसंगी विशद करून सांगितले. ...
जुन्या पेंशनबाबत आयोजित या सहविचार सभेचे प्रास्ताविक प्रा. जगदीश ब्राह्मणकर यांनी केले. सभेच्या आयोजनाचे महत्त्व याप्रसंगी विशद करून सांगितले. सभेत प्रा. विनोद हातझाडे, डॉ. राजेश गादेवार, मुख्याध्यापक लोमेश्वर सोनटक्के, प्रा. राजेश तुमसरे, प्रा. रामकृष्ण भेलावे, प्रा. प्रबळ सरकार आदी मान्यवरांनी जुन्या पेंशनसंदर्भातील सद्यस्थिती व पुढील उपाययोजनांबाबत विचार व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक व जुन्या पेंशनचे लढवय्ये शिलेदार प्रा. प्रदीप महल्ले म्हणाले, आज सर्वांनी एकत्र येऊन सर्वशक्तीनिशी लढा देण्याची गरज आहे. शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आज आपल्यावर ही वेळ आली आहे. खरे तर अजूनही शासन व शिक्षण विभाग संभ्रमावस्थेतच आहे. कर्मचाऱ्यांची नियुक्ती जर २००५ पूर्वी झाली असेल तर शासनाकडे अनुदान नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने अनुदान दिले. यात कर्मचाऱ्यांचा काही दोष नाही. शंभर टक्के अनुदान हे २००५ नंतर मिळाले असेल तर ते शासनाचे आर्थिक धोरण त्यास जबाबदार आहे. यात कर्मचाऱ्यांचा काहीही दोष नाही. पेंशनसाठी कर्मचाऱ्यांचा नियुक्ती दिनांक महत्त्वाचा असतो. कर्मचाऱ्यांचा काही दोष नसतानाही त्यांना पेंशनपासून वंचित ठेवण्यात येत आहे. यासाठी सर्वांनी एकजूट होऊन लढा देण्याची गरज आहे, असे आवाहन याप्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष मुख्याध्यापिका वैशाली धारस्कर यांनी एकीचे बळ मिळेल, असा आशावाद व्यक्त करून आपण सर्वांनी आपल्या हक्कासाठी लढावे असे सांगितले. सहविचार सभेला भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून पेंशन कर्मचारी सहभागी झाले होते. संचालन प्रा. अनिल बेहेरे यांनी केले, तर सभेकरिता प्रा. जगदीश ब्राह्मणकर, प्रा. अनिल बेहरे, प्रा. सूरज गोंडाणे, प्रा. प्रदीप थानथराटे, प्रा. विनोद हातझाडे, प्रा. राजेश भालेराव, प्रा. केशव कापगते, प्रा. सिगनजूळे, प्रा. गहाणे, राजेंद्र मेश्राम, प्रमोद सेलोकर आदींनी सहकार्य केले.