सत्ताधाऱ्यांनो, विदर्भावरील अन्याय दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:45 AM2018-09-13T00:45:01+5:302018-09-13T00:48:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : विदर्भावरील अन्याय दूर करण्यासाठी व आपल्या हक्कासाठी आपण एकजुट दाखविल्या शिवाय विदर्भ राज्य होणे शक्य नाही़ वेगळ्या विदर्भा शिवाय पर्याय नाही़ त्यासाठी सवार्नी एकत्र येण्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांनी विदर्भावरील अन्याय दूर करावा अन्यथा वेगळा विदर्भ द्यावा किंवा विदर्भ खाली करावा, असे मत विदर्भवादी नेते राम नेवले यांनी व्यक्त केले. ते लाखांदूर येथे झालेल्या सभेत बोलत होते.
लाखांदूर येथील बोरकर काँम्प्लेक्स येथे मंगळवारला विदर्भ राज्य आंदोलन समितीची सभा संपन्न झाली असून, या सभेला कोअर कमेटीचे रंजना मामडे, देविदास लांजेवार, मोरेश्वर बोरकर, अविनाश ब्राम्हणकर, अॅड. मोहन राऊत, भगवान झंझाड, हिरालाल खोब्रागडे, मनोज बन्सोड, भुमेश्वर महावाडे, प्रल्हाद भुरे यांच्यासह आदी उपस्थित होते.
नेवले म्हणाले, वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाने आता अभूतपूर्व जोर धरला असून आंदोलनाचे नेतृत्व युवकांच्या हातात सोपवण्यात आले आहे. समितीने गेल्या पाच वर्षांत अनेक आंदोलने केली परंतू भाजपा सरकार म्हणजे गेंडय़ाच्या कातड्याचे सरकार आहे.
या सरकारला जनतेच्या समस्या व मागणी नको आहे. यांना केवळ सत्ता पाहिजे. म्हणूनच सत्तेत येण्यापुर्वी दिलेल्या विदर्भ राज्य करण्याचे आश्वासनाचा यांना विसर पडला आहे. आजी माजी राज्यकर्त्यांकडूनही यासाठी हवे त्या प्रमाणात प्रयत्न होत नसल्याने विदभार्तील तरूणसुध्दा बेरोजगार आहे़ जर तरूणांच्या हाताला काम मिळवून द्यायचे असेल तर
सत्तेत येण्यापुर्वी विदभार्तील दोन्ही मोठ्या नेत्यांनी वेगळा विदर्भ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत येताच त्यांना वेगळ्या विदभार्चा विसर पडला आहे. आपल्या आता तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणतात की, वेगळा विदर्भ अजेंड्यावर नाही. यांना यांची जागा दाखवून स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने २ आॅक्टोंबरला संपूर्ण विदभार्तील ११ ही जिल्ह्याच्या ठिकाणी १ दिवशीय सामूहिक उपोषण व आंदोलन करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.
यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती लाखांदूर तालुका कार्यकारीणीच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, यात युवा आघाडीच्या महासचिव पदी प्रियंक बोरकर, तालुका उपाध्यक्ष जितेंद्र ढोरे, जितू सुखदेवे, कोषाध्यक्ष भूषण चित्रिव, समिती उपाध्यक्ष संजय पिलारे, सदस्य डि.एच. परसोडकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत. सभेचे संचालन तालुकाध्यक्ष विश्वपाल हजारे यांनी केले तर आभार शिलमंजू सिव्हगडे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी प्रकाश देशमुख, बि.के. लांडगे, प्रेमदास खोब्रागडे, चंद्रशेखर खेडीकर, विकास बुराडे, पवन समरत यांनी सहकार्य केले.