Bhandara Fire; राज्यपालांनी केली भंडारा रुग्णालयातील अपघातग्रस्त कक्षाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 11:08 IST2021-01-13T11:07:44+5:302021-01-13T11:08:11+5:30
Bhandara Fire राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी बुधवारी सकाळी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन अपघातग्रस्त कक्षाची पाहणी केली.

Bhandara Fire; राज्यपालांनी केली भंडारा रुग्णालयातील अपघातग्रस्त कक्षाची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात झालेल्या अग्निकांडात दहा चिमुकल्यांचा जीव गेला होता. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी दुःख व्यक्त केले होते. राज्यपालांनी बुधवारी सकाळी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन अपघातग्रस्त कक्षाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनील मेंढे, आमदात परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोर सोबत होते