लक्ष्मीपूजनाच्या पर्वावर भंडारा जिल्ह्यात गोवारी समाजाने पुजली ढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 10:06 PM2020-11-15T22:06:01+5:302020-11-15T22:07:12+5:30
Bhandara News Diwali अनेक वर्षाच्या परंपरेचा वारसा जपत डफाच्या सुरेख आवाजात दादऱ्याची साथ घेत लक्ष्मीपूजेच्या घटकेला विधीवत ढाल पुजन करून गोवारी समाजाने उत्साही वातावरणात ढाल उभी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: अनेक वर्षाच्या परंपरेचा वारसा जपत डफाच्या सुरेख आवाजात दादऱ्याची साथ घेत लक्ष्मीपूजेच्या घटकेला विधीवत ढाल पुजन करून गोवारी समाजाने उत्साही वातावरणात ढाल उभी केली. संपूर्ण समाजाने एकत्र येत ढाल पुजून पारंपारिक नृत्याने विधीवत दिवाळी उत्सव साजरा केला. अख्ख्या विदर्भात गोवारी समाज मोठ्या प्रमाणात स्थिरावला आहे. पालांदूर येथे तीस-चाळीस कुटुंबे गोवारी समाजाची आहेत. लक्ष्मी पूजेच्या वेळी पारंपारिक असलेली ढाल व इतर पारंपारिक वाद्य वाजवित व दादरे गात मोठ्या थाटात ढाल पूजन पार पडले. यावेळी गोकुळ राऊत, सदाराम बावनथडे, तुळशीराम राऊत यांनी दादरे (बिवरे) गात ढाल उत्सवाची परंपरा कायम राखली.