जीआर निघाला मात्र बोनस मिळाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:06 PM2018-05-15T23:06:07+5:302018-05-15T23:06:50+5:30

शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोनशे रूपये बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.

The GR went out but the bonus was not received | जीआर निघाला मात्र बोनस मिळाला नाही

जीआर निघाला मात्र बोनस मिळाला नाही

Next
ठळक मुद्देशेतकरी प्रतीक्षेत : मार्केटिंग फेडरेशन कार्यालयात पायपीट सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोनशे रूपये बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. या घोषणेच्या तब्बल तीन महिन्यानंतर राज्य शासनाने त्यासंबंधीचा जीआर काढला. मात्र बोनस वाटपाचे आदेश आणि निधी अद्यापही उपलब्ध करुन दिला नाही. त्यामुळे जीआर निघाला मात्र त्याचे वाटप केव्हा होणार? असा प्रश्न धान उत्पादकांनी केला आहे.
शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी करते. यंदा शासनाने धानाचा हमीभाव अ दर्जाच्या धानाला १,५५० रूपये जाहीर केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ४० हजारावर शेतकºयांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यावर्षी ५ लाखाहून अधिक क्विंटल धानाची खरेदी केली.
मागीलवर्षी अत्यल्प पावसाचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. जवळपास ४० टक्के धानाच्या उत्पादनात घट झाल्याने खरेदीत घट झाली. धानाच्या कमी उत्पादनामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्चसुध्दा निघाला नाही. त्यामुळे शासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दोनशे रूपये बोनस देण्याची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकरी पात्र ठरले. शासनाने घोषणेनंतर तब्बल तीन महिन्यांनी जीआर काढण्यात आला. त्यात प्रती शेतकºयाला ५० क्विंटलपर्यंत बोनस देण्याची मर्यादा लावली. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही बोनस वाटप करण्यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला आदेश आलेले नाही.
रबीसाठी खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार?
भंडारा जिल्ह्यात रबी धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या रब्बी धान निघाले असून काही शेतकरी त्या धानाची विक्री सुध्दा करीत आहे. मात्र शासनाने रबी हंगामातील धान खरेदीसाठी शासकीय धान खरेदी केंद्र सुरु केलेले नाही. त्यामुळे शेतकºयांना कमी दराने व्यापाºयांना धानाची विक्री करावी लागत आहे.

Web Title: The GR went out but the bonus was not received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.