वधूच्या खात्यात जमा होणार अनुदान
By admin | Published: December 20, 2014 10:34 PM2014-12-20T22:34:56+5:302014-12-20T22:34:56+5:30
बोगस सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून अनुदान लाटण्याचा गोरखधंदा तालुक्यासह परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. हा गोरखधंदा आता बंद होणार असून, सामूहिक विवाह
शासन निर्णय : खऱ्या लाभार्थ्यांना मिळणार अनुदान, गोरखधंद्याला बसणार आळा
भंडारा : बोगस सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून अनुदान लाटण्याचा गोरखधंदा तालुक्यासह परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. हा गोरखधंदा आता बंद होणार असून, सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करणाऱ्या वधू-वरांना शासनाकडून मिळणारे १० हजार रूपयांचे अनुदान थेट वधूंच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती यामुळे गोरगरीब सर्वसामान्यांना आपल्या पाल्यांचे लग्न लावून देण्यास आर्थिक अडचण येत असते. आर्थिक बाजू कमकुवत असल्याने आपल्या पाल्यांसाठी पाहिजे असे चांगले स्थळ मिळत नसते. अशा गोरगरिबांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी शासनाने १० हजार रूपये मदत जाहीर केली, अशी ही योजना आहे.
या सयोजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून या सोहळ्यामध्ये लग्न करणाऱ्या जोडप्यांना १० हजार रूपये शासनाकडून अनुदान म्हणून मिळायचे. सदर अनुदान प्रत्यक्षरित्या त्या जोडप्यांना न देता सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या संस्थेला देण्यात येत होते. ज्या जोडप्यांचे अगोदरच लग्न होवून ज्यांना अपत्य झाली, अशी जोडपीही विवाह सोहळ्यात पुन्हा लग्न लावून घ्यायची. तसेच शासनाच्या अनुदान लाटत असे. विविध संस्था असे बोगस सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाची लूट करायचे. यामुळे खरे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहत असत. त्यामुळे शासनाने सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या वधू-वरांना १० हजार रूपये अनुदान थेट वधूच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेत आहे. (नगर प्रतिनिधी)