साकोलीत भटक्या सर्कस कुटुंबीयांना धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:35 AM2021-03-17T04:35:44+5:302021-03-17T04:35:44+5:30

साकोली : एक महिन्यापासून शहरात आलेल्या सर्कस भटके कुटुंबीयांना अखेर सर्कस मीनाबाजार परवानगी मिळाली नसून, त्या कुटुंबांतील लहान बालकांचा ...

Grain distribution to nomadic circus families in Sakoli | साकोलीत भटक्या सर्कस कुटुंबीयांना धान्य वाटप

साकोलीत भटक्या सर्कस कुटुंबीयांना धान्य वाटप

googlenewsNext

साकोली : एक महिन्यापासून शहरात आलेल्या सर्कस भटके कुटुंबीयांना अखेर सर्कस मीनाबाजार परवानगी मिळाली नसून, त्या कुटुंबांतील लहान बालकांचा अन्नपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. याबाबत येथील दिशा फाउंडेशनच्या संचालिका सरिता फुंडे यांनी साकोली मीडियाच्या बातमीची दखल घेत तातडीने होमगार्ड परेड ग्राउंडवर सदस्यांना पाठवून धान्यपोते व नगदी मदतनिधी देत दिशातर्फे माणुसकीप्रेमाची मिसाल कायम केली.

साकोलीत आलेल्या सर्कस भटके कुटुंबीयांना अखेर परवानगी न मिळाल्याने तब्बल एक महिन्यापासून कुटुंबांतील लहान बालकांच्या अन्नभोजन सोयीसाठी अखेर दिशा फाउंडेशनच्या संचालिका सरिता फुंडे सरसावल्या. त्यांनी त्वरित फाउंडेशनच्या सदस्यांना पाठविले. होमगार्ड परेड ग्राउंडवरील तंबूतील पाटील, बैरागी, माली व सोनकुसरे या १९ सदस्यपरिवारांना अन्नधान्याचे पोते व मदतनिधी देत दिशाने माणुसकीप्रेमाची मिसाल कायम ठेवली. या गौरवपूर्ण कार्यात ॲड. काजल सुनील फुंडे, खुशाल फुंडे, रोशन बोकडे, अनुप मेश्राम, मनोज सिंगोर, मिंटू सिंगोर, नरेश वलथरे, प्रशांत बन्सोड, आशिष चेडगे, जयकृष्ण डुंभरे आदी उपस्थित होते.

Web Title: Grain distribution to nomadic circus families in Sakoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.