धानाचे चुकारे अन् बाेनस तुमच्याकडे, आम्ही जगायचे कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:16 AM2021-09-02T05:16:49+5:302021-09-02T05:16:49+5:30

गत खरीप हंगामात विकलेल्या धानाच्या बाेनसची अर्धी रकम अद्यापही शेतकऱ्यांच्या हाती पडली नाही. रब्बी हंगामातील धानाचे पैसेही मिळाले नाही. ...

Grain mistakes Unbanes to you, how we live | धानाचे चुकारे अन् बाेनस तुमच्याकडे, आम्ही जगायचे कसे

धानाचे चुकारे अन् बाेनस तुमच्याकडे, आम्ही जगायचे कसे

Next

गत खरीप हंगामात विकलेल्या धानाच्या बाेनसची अर्धी रकम अद्यापही शेतकऱ्यांच्या हाती पडली नाही. रब्बी हंगामातील धानाचे पैसेही मिळाले नाही. अशा स्थितीत खरीप हंगामात राेवणी झाली. महागडी बियाणे घेतले. मजुरीवर खर्च केला. पैसे नसतानाही तजबीज केली. आता सणासुदीचे दिवस ताेंडावर आहेत. कान्हाेबा अर्थात जन्माष्टमीचा महत्त्वाचा सण बिना पैशाने साजरा करावा लागला. मजुरांना द्यायला मजुरीचे पैसे नाही. सण साजरा करायला. एक सदामही हातात नाही. सकाळपासून राबराब राबावे आणि पैसांसाठी सावकाराच्या दारात उभा राहावे काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

मे महिन्यापासून विक्री केलेल्या रब्बी हंगामातील धानाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या हातात आले नाही. ४१८ काेटी रुपये शासनाने मंजूर केल्याचे सांगितले गेले. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाही. उधार उसनवार करून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मात्र शासन काेणताच ताेडगा काढायला तयार नाही.

बाॅक्स

१४ काेटीच मिळाले

पालांदूर सेवासहकारी संस्थेच्या आधारभूत केंद्रांतर्गत शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंतचे चुकारे मिळाले. मात्र यात अत्यल्प शेतकऱ्यांचा समावेश आहे. गाेदामाची समस्या उभी असल्याने जुलै महिन्यातच सर्वाधिक धानाची खरेदी झाली. जिल्ह्याला मिळालेल्या सुमारे १३८ काेटींपैकी पालांदूर परिसराला केवळ १४ काेटी रुपयेच मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ धानाचे चुकारे द्यावे, अशी मागणी आहे.

Web Title: Grain mistakes Unbanes to you, how we live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.