धान्य दुकानदारांना आगाऊ पैसे देण्याची गरज नाही
By admin | Published: January 3, 2016 01:12 AM2016-01-03T01:12:50+5:302016-01-03T01:12:50+5:30
घरपोच योजनेंतर्गत शासकीय गोडावूनमधून धान्य वाहनात मांडून देण्याची जबाबदारी ही हमाल कंत्राटदाराचीच असून यापुढे धान्य दुकानदारांना आगावू पैसे देण्याची गरज नाही,....
योजनेचा संभ्रम अखेर दूर : तहसीलदारांनी केले आश्वासित
तुमसर : घरपोच योजनेंतर्गत शासकीय गोडावूनमधून धान्य वाहनात मांडून देण्याची जबाबदारी ही हमाल कंत्राटदाराचीच असून यापुढे धान्य दुकानदारांना आगावू पैसे देण्याची गरज नाही, असे तुमसरचे तहसीलदार डी.टी. सोनवाने यांनी तुमसर व मोहाडी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या संयुक्त बैठकीत स्पष्ट करून दुकानदारांना घरपोच योजनेबाबत आश्वासित केले.
यावेळी एच. एस. मडावी, सुनिल लोहारे, मोहाडीचे गणवीर, गोदाम व्यवस्थापक मेश्राम व बोरकर यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद कारेमोरे, गुलराज कुंदवानी, प्रमोद घरडे, शालीकराम गौरकर, भूपत सार्वे, बाळू भोबळे, मंचावर उपस्थित होते.
संपूर्ण भंडारा जिल्ह्यात घरपोच योजनेचा शुभारंभ करण्यात आला. परंतु सदर योजनेत योग्य दिशानिर्देश नसल्याने हमाल कामगार व स्वस्त दुकानदारात संभ्रम निर्माण झाला होता. परिणामी हमाल कामगारांनी संप पुकारून काम बंद केले.
त्यामुळे ग्रामीण भागातील दुकानापर्यंत महिन्याच्या शेवटी धान्य पोहचल्याने घरपोच योजनेला गालबोट लागले होते. पुढेही तसेच सुरु राहणार काय? या संभ्रमात धान्य दुकानदार सापडले होते. ते दुकानदाराचे घरपोच योजनेविषयी संभ्रम दूर व्हावे, याकरिता अधिकाऱ्यांनी दुकानदारांना उद्भवणाऱ्या अडचणी व समस्येवर योग्य उपाय व मार्गदर्शन सूचवावा म्हणून ग्राहक दिनी तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार तुमसर व मोहाडी तालुक्यातील धान्य दुकानदारांची संयुक्त बैठकीचे आयोजन येथील सिंधी धर्मशाळेत केले होते. त्या सभेत घरपोच योजनेअंतर्गत दुकानदारांना गोडावूनमध्ये न येता चालान द्वारे रक्कम भरल्याच्या नंतर पुढील सात दिवसाच्या आत धान्य दुकानदारांच्या दुकानापर्यंत पोहोचते व्हावे, या करिता वाहतूक कंत्राटदाराला आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे या योजनेत येणाऱ्या धान्याच्या प्रती करण्यात २ ते ३ किलो धान्य कमी मिळाले होते. त्यावर सांगताना गोडावूनमधून धान्य मोजूनच मिळणार असून धान्य स्वस्त धान्य दुकानात पोहचल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदाराने आलेल्या धान्याचे पाच टक्के धान्य मोजून आपली खात्री करेल व तरी सुद्धा धान्य कमी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार असेही सांगितले. त्याचप्रमाणे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हमालीबाबतचा तर गोडावून मधून वाहनात धान्य चढविण्याची हमाली देण्याची जबाबदारी हमाल कंत्राटदाराची राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)