खरीपातील उघड्यावरील धान अंकुरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:23 AM2021-06-30T04:23:13+5:302021-06-30T04:23:13+5:30
भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात ३७ लाख ५१ हजार २९० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. मात्र अपुऱ्या गाेदामामुळे धान उघड्यावर ...
भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात ३७ लाख ५१ हजार २९० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. मात्र अपुऱ्या गाेदामामुळे धान उघड्यावर ठेवण्याची वेळ आली. उन्हाळ्याच्या दिवसात ठीकही हाेते. परंतु आता पावसाळा लागला तरी धान उघड्यावरच आहे. पवनी तालुक्यातील धानाेरी येथील शाळेच्या आवारात धानाच्या पाेत्याची थप्पी लावण्यात आली आहे. आता पावसाळा सुरु झाला. पावसामुळे धान ओले हाेवून अंकुरत आहेत. जिल्ह्यातील इतरही केंद्रावर अशीच अवस्था आहे. पावसाळा सुरु हाेण्यापूर्वी धानाची उचल हाेणे अपेक्षीत हाेते. परंतु भरडाई अभावी धान गाेदाम रिकामे झाले नाही. त्यातच रबी हंगामातील धानाची खरेदी सुरु झाली. यामुळे आजही खरीपातील शेकडाे क्विंटल धान उघड्यावर आहे. पावसामुळे ओला हाेवून धान अंकुरत असून यात शासनाचे माेठे नुकसान हाेत आहे.
बाॅक्स
ताडपत्रांचा अभाव
उघड्यावर असलेला धान ताडपत्रीने झाकण्याचा तुटपूंजा प्रयत्न करण्यात आला. मात्र खरेदी केंद्राकडे ताडपत्राचा अभाव दिसत आहे. अपुऱ्या ताडपत्रांनी कसाबसा धान झाकला आहे. परंतु पावसामुळे हा धान आता ओला हाेत आहे. दरराेज पाउस काेसळत असून धान ओलाचिंब हाेत आहे.