संपामुळे ग्रामपंचायत प्रशासन प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:08 PM2018-01-28T22:08:41+5:302018-01-28T22:09:35+5:30

मागण्यांसाठी ग्रामपंचायतच्या संगणक परिचालक यांनी १ जानेवारीपासून संप पुकारला आहे. यामुळे ग्रामपंचायतचे प्रशासन प्रभावित झाले आहे.

Gram Panchayat administration affected due to the strike | संपामुळे ग्रामपंचायत प्रशासन प्रभावित

संपामुळे ग्रामपंचायत प्रशासन प्रभावित

Next
ठळक मुद्देसंगणीकृत दाखल्यासाठी ओरड : संगणक परिचालकांचा पानटपरीवर ठिय्या

आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : मागण्यांसाठी ग्रामपंचायतच्या संगणक परिचालक यांनी १ जानेवारीपासून संप पुकारला आहे. यामुळे ग्रामपंचायतचे प्रशासन प्रभावित झाले आहे.
संगणक परिचालकांचे मानधन थकल्याने जानेवारी महिन्याचे सुरुवातीपासून संप पुकारण्यात आला आहे. या संपाला महिना पूर्ण होत आहे. संगणक परिचालकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी निर्णायक स्थिती निर्माण झाली नाही. ग्रामपंचायतमध्ये असणारे संगणक धुळीत आहेत.
संगणक परिचालकांचे संपामुळे ग्रामपंचायतमध्ये संगणकीकृत दाखले प्राप्त होणे बंद झाले आहे. यामुळे गावकरी ग्रामपंचायत प्रशासनाला वेठीस धरत आहेत. राज्य शासन ग्रामपंचायतला विकास कामासाठी अनुदान देत आहे.
या अनुदानाचे १० टक्के राशी संगणक परिचालकांचे मानधनावर खर्च करण्यात येत आहे. यामुळे अल्प अनुदान राशीत गावाचे विकास कामे प्रभावित होत आहेत. गावात कामे करताना अडचणी येत असल्याने सरपंच आक्षेप घेत आहेत. राज्य शासनाने या संगणक परिचालकांना स्वतंत्र मानधन राशी देण्याची आवश्यकता असल्याचे सरपंच यांनी नमूद केले आहे.
दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनात संगणक परिचालकांनी संप पुकारल्याने त्याचा पानटपरीवर ठिय्या दिसून येत आहे. सिहोरा परिसरात रोज संगणक परिचालक पानटपरीवर चर्चा करताना दिसून येत आहे. गावकरी दाखल्यासाठी संगणक परिचालकाचे थेट घर गाठत आहेत.
दिवसरात्र कधीही त्याचे घरावर थाप दिली जात आहे. शासकीय कार्यालयात संगणक दाखल्यांना अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे गावकºयांची चांगलीच धांदल उडत आहे. तात्काळ तोडगा काढण्याची गरज आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संगणक परिचालकांचा संप असल्याने गावकरी दाखले करिता ओरड करीत आहे. प्रशासन प्रभावित ठरत असून तोडगा काढण्याची गरज आहे.
-राजेश बारमाटे, सरपंच मुरली.
मानधन वाटप व अन्य समस्या निकाली काढण्यात येत नाही तोपर्यंत संगणक परिचालकांचा संप सुरु राहील व न्यायासाठी लढा सुरु आहे.
-सुनिल शिवने, तालुकाध्यक्ष संगणक परिचालक संगठणा तुमसर

Web Title: Gram Panchayat administration affected due to the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.