जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:07 AM2017-09-07T00:07:51+5:302017-09-07T00:08:09+5:30

जिल्ह्यात १४ आॅक्टोंबरला ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यादिवशी धम्मचक्र प्रवर्तक दिन असल्याने जिल्ह्यातील सर्व निवडणुका रद्द करून पुढील तारखेस घ्याव्या, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने केली आहे.

Gram panchayat of the district further postponed elections | जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकला

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकला

Next
ठळक मुद्देभारिप बहुजन महासंघाची मागणी : जिल्हाधिकाºयांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात १४ आॅक्टोंबरला ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यादिवशी धम्मचक्र प्रवर्तक दिन असल्याने जिल्ह्यातील सर्व निवडणुका रद्द करून पुढील तारखेस घ्याव्या, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने केली आहे.
भंडारा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या मार्फतीने भारिप बहुजन महासंघाने राज्य निवडणूक आयोगाला निवेदन दिले आहे. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रंजित कोल्हाटकर यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.
नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात मुदत संपणाºया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. निवडणुकी संदर्भात १ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागली आहे. १४ आॅक्टोबरला जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका होवू घातले आहे.
१४ आॅक्टोंबरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर दिक्षाभूमिवर लाखो नागरिकांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली होती. तो दिवस नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या धम्मचक्र प्रवर्तक दिनासाठी राज्यातून लाखो बौद्ध बांधव नागपूर दिक्षाभूमीवर येत असतात. नेमक्या याच दिवशी राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो बौद्ध बांधव या निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहणार आहेत.
बौद्ध समाज बांधव मतदानाच्या मुलभूत अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी घोषित केलेली ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख रद्द करून पुढील तारखेला निवडणुका घ्याव्या, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने केली आहे.
यावेळी निवेदन देणाºया शिष्टमंडळात भाकपचे हिवराज उके, समाज कल्यान माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, समाज कल्याण माजी सभापती चरणदास मेश्राम, दिगांबर रामटेके, सदानंद ईलमे, माणिकराव कुकडकर, हरकर उके, रामचंद्र कानेकर, हरीदास मेश्राम, अनिल वासनिक, समिक्षक बौद्धप्रिय आदी उपस्थित होते.
 

Web Title: Gram panchayat of the district further postponed elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.