गावागावांत ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:55 AM2021-01-08T05:55:32+5:302021-01-08T05:55:32+5:30
निवडणुकीसाठी तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार देवीदास बोंबर्डे यांनी पथकातील अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पंचायत समिती मोहाडीच्या सभागृह घेतले. या ...
निवडणुकीसाठी तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार देवीदास बोंबर्डे यांनी पथकातील अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पंचायत समिती मोहाडीच्या सभागृह घेतले. या प्रशिक्षणाला नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे, निवडणूक निर्णय नायब तहसीलदार विजय बोरकर, गटविकास अधिकारी रवींद्र वंजारी उपस्थित होते. या प्रशिक्षणाला २४० कर्मचारी उपस्थित होते. ५२ प्रभागात निवडणूक होत असून तेवढेच मतदान केंद्र राहणार आहेत. राखीव पथकांची संख्या ८ आहे. जिल्हा प्रशासनाने ६२ ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदान कर्मचाऱ्यांना मतदान स्थळी जाण्यासाठी ५ बसेस व १० जीपगाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मोहाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीला अपेक्षित खर्च १५ लाख येणार आहे. त्यापैकी केवळ मोहाडीला एक लाख ७५ हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी देवीदास बोंबर्डे यांनी दिली. आदर्श मतदान केंद्र कोणते राहील हे निवडणूक विभागाने ठरविले नाही. स्ट्रॉंग रूम तहसील कार्यालयात केली गेली आहे. तसेच मतमोजणीही तहसील कार्यालयात केली जाणार आहे. तालुका प्रशासनाने निवडणुकीची संपूर्ण तयारी केली आहे.
बॉक्स
रोहात सर्वाधिक उमेदवार मैदानात
निवडणुकीच्या मैदानात ३४९ उमेदवार उभे आहेत. यात १७ ग्रामपंचायतींमधील महिला उमेदवारांची संख्या १८८ एवढी तर पुरुष उमेदवारांची संख्या १६१ एवढी आहे. सर्वाधिक ३१ उमेदवार रोहा ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लढवीत आहेत. तसेच रोहा येथे सर्वाधिक १६ महिला उमेदवार तर पुरुष उमेदवार १५ निवडणुकीत उभे आहेत. तालुक्या सर्वात मोठी ग्रामपंचायत जांभोरा असून ११ उमेदवार निवडून द्यायचे आहेत.