ग्रामपंचायत तिजोरीत दुष्काळ

By Admin | Published: September 15, 2015 12:39 AM2015-09-15T00:39:15+5:302015-09-15T00:39:15+5:30

ग्रामपंचायतीच्या तिजोरीत येणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर ब्रेक लावण्यात आल्याने अल्प लोकवस्तीच्या असणाऱ्या ग्राम पंचायतीत दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे.

Gram panchayat safety drought | ग्रामपंचायत तिजोरीत दुष्काळ

ग्रामपंचायत तिजोरीत दुष्काळ

googlenewsNext

१३ वा वित्त आयोग गुंडाळला : सामान्य फंड रिकामा, असंतोषाचा पोळा फुटणार
रंजित चिचखेडे चुल्हाड(सिहोरा)
ग्रामपंचायतीच्या तिजोरीत येणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर ब्रेक लावण्यात आल्याने अल्प लोकवस्तीच्या असणाऱ्या ग्राम पंचायतीत दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. सिहोरा परिसरातील गावात विकास कामे प्रभावित झाली आहेत. यातच आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या असल्याची प्रतिक्रिया आहेत.
सिहोरा परिसरात ४७ गावे असून ग्रामपंचायती आहेत. बपेरा, चुल्हाड, हरदोली आणि सिहोरा गावे वगळता अन्य गावात दुष्काळाचे चित्र आहे. दोन हजारपेक्षा कमी लोकवस्तीच्या गावात आर्थिक स्त्रोत निर्मितीचे साधने नाहीत.
यामुळे या ग्रामपंचायतीचे मासीक सभा चहापान विना सुरु आहेत. शासनाने १३ वा वित्त गुंडाळला आहे. १४ व्या वित्त आयोगाचे पुर्नगठन केले आहे. लोकसंख्येच्या आधारावर या आयोग अंतर्गत निधी उपलब्ध केला जाणार आहे. परंतु या आयोगाचे बचत खाते उघडण्यात आली असतांना निधी प्राप्त झाला नाही. शासनाचे परिपत्रक प्राप्त झाले आहे. खर्चित आराखडा प्राप्त झाला नाही. विकासाच्या प्रवाहात गावांना आणण्यासाठी तिजोरीचा पिटारा उघडण्यात आला होता. परंतु या योजनेला ब्रेक देण्यात आले आहे. या शिवाय घर कर मागणीवर सध्या बंदी असल्याने सामान्य फंडात जमा होणारा हा निधी दूर गेला आहे. गावात नळ योजना आहे. यामुळे पाणी पट्टी कराची राशी गोळा करण्यात येत आहे. परंतु ही राशी वीज बिलाचे देयक, देखभाल दुरुस्ती आदीवर खर्च केली जात आहे.
या आधी विकास कामे, बांधकाम मधून पाच टक्के राशी ग्रामपंचायतीना प्राप्त करण्याची तरतूद होती. ही प्रथायादीच बंद करण्यात आली आहे. या परिसरात एका गावाची लोकवस्ती ६०० च्या घरात असून वार्षिक उत्पन्न ७७ हजार रुपये आहे. याशिवाय कर्मचारी, स्टेशनरी, विद्युत बिल, चहा पान, विद्युत खर्च अशा कामाचा वार्षिक खर्च अंदाजे १ लाख २९ हजार रुपये आहे. गावकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सरपंचांनी उसनवारीची ब्लिचिंग पावडरची खरेदी केली आहे.
या राशी प्राप्तीकरिता व्यवसायीक तगादा लावत आहेत. ग्रामपंचायत तिजोरीत उलटफेर करण्याचा प्रयत्न सरपंचाचा आहे. परंतु निधीच नसल्याने सरपंच तोंडघशी पडले आहेत. निधी अभावी सार्वजनिक दिवाबत्ती प्रभावित झाली आहे. बल्प घेण्यासाठी व्यवसायीकांना अजीजी करण्याची पाळी आली आहे. कोंडवाडा हे आर्थिक उत्पन्नाचे साधन होते. कोंडवांडे आता कोसळली असून जनावरे ही या कोंडवाड्यापासून कोसो दूर गेली आहे. गावात सिमेंट रस्ते, नाली, शासकीय इमारती, सभामंडप, अंगणवाडी, शाळाचे बांधकाम चकाचक झाली आहे. गावात हे काम करण्यासाठी जागा नाही. लोकप्रतिनिधींचे स्थानिक निधी अंतर्गत गावात तीन लाख खर्चाचे सभामंडपाची खैरात वाटण्यात आली आहे. आधी बांधकाम करण्यात आलेल्या सभामंडपात जनावरांचे बैठकीचे साधन झाली आहे. प्रवाशी निवारांचे पुनर्जीवित करण्यासाठी मायबाप लोकप्रतिनिधी सापडत नाही. हा प्रवासी निवारा निधीअभावी वांझोटा ठरत असताना कुणाचे लक्ष नाही. हातपंपाला गढूळ पाणी येत आहे. या पाण्यावर बंदी आणली जात नाही. या शिवाय नवीन हातपंपाचे नियोजन नाही. (वार्ताहर)

Web Title: Gram panchayat safety drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.