लसीकरणाचा गैरसमज दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:39+5:302021-06-11T04:24:39+5:30
अर्जुनी मोरगाव तालुक्यात अशी अनेक गावे आहेत. त्यामध्ये आदिवासी कुटुंबाची संख्या जास्त आहे. अशा गावामध्ये आरोग्य कर्मचारी कोरोना प्रतिबंधात्मक ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यात अशी अनेक गावे आहेत. त्यामध्ये आदिवासी कुटुंबाची संख्या जास्त आहे. अशा गावामध्ये आरोग्य कर्मचारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी जातात तेव्हा त्यांना आदिवासी कुटुंबाकडून अज्ञान व अंधश्रद्धेमुळे पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या भागातील लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून येते.
कोरोना लस घेतल्यामुळे दोन वर्षांत मृत्यू होतो. नपुंसकता येते, महिलांना गर्भधारणा होत नाही असे गैरसमज आदिवासी कुटुंबातील नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत. गैरसमज दूर करण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने स्वीकारून प्रत्येक गावातील लसीकरणाचे प्रमाण शंभर टक्के होण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, अशी मागणी केली जात आहे. शासन काही कालावधी निश्चित करून त्या कालावधीत शंभर टक्के कोरोना लसीकरण मोहीम राबविल्यास अशा ग्रामपंचायतींना गाव विकासासाठी १५ लाख रुपये निधी मंजूर करणार केला जाणार आहे.