भीतीच्या सावटात होते ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 10:29 PM2018-04-29T22:29:08+5:302018-04-29T22:29:08+5:30
आमगाव तालुक्यातील टेकरी ग्रामपंचायतची इमारत जीर्ण झाली आहे. ग्रामसभा व कार्यालयीन वेळेदरम्यान अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीर्ण इमारतीचे नवीन बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कालीमाटी : आमगाव तालुक्यातील टेकरी ग्रामपंचायतची इमारत जीर्ण झाली आहे. ग्रामसभा व कार्यालयीन वेळेदरम्यान अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीर्ण इमारतीचे नवीन बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पंचायत समिती आमगाव अंतर्गत टेकरी ग्रामपंचायतची इमारत १९६२ मध्ये तयार करण्यात आली. या इमारतीला ५६ वर्ष झाले असून आता ही इमारत जीर्ण झाली आहे. सदर इमारतीच्या भिंती व स्लॅब कोसळत आहे. कार्यालयीन कामानिमित्त किंवा ग्राम सभेदरम्यान मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्राम सभेला शेकडो नागरिकांची उपस्थिती असते. अशावेळी स्लॅब कोसळल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टेकरी व मानेकसा येथील लोकसंख्या ११०२ असून २०० च्यावर कुटुंब संख्या आहे.
येथील नागरिक शेती व शेतीशी निगडित व्यवसायावर अवलंबून असतात. ग्रामपंचायतीकडून विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी सचिव कौशल्या कोंबडीबुरे, सरपंच शेवंता सोनवाने, उपसरपंच महेंद्र रहांगडाले प्रयत्नरत असतात. परंतु जीर्ण इमारतीमुळे कधी धोका होईल हे सांगता येत नाही. पंचायत समितीकडे नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव पाठविला. मात्र त्याची अद्यापही दखल घेतली नाही.
ग्रामपंचायतच्या नवीन इमारत बांधकामासाठी २०१४ पासून दरवर्षी ठराव पाठवित आहोत.परंतु प्रशासनाने याची अद्यापही गांर्भियाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने याची वेळीच दखल घेवून इमारत बांधकामाला मंजुरी देण्याची गरज आहे.
-शेवंता सोनवाने
सरपंच ग्राम पंचायत टेकरी.