ग्र्रामगीता ही ग्रामविकासाची गुरुकिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:01 PM2018-07-08T22:01:11+5:302018-07-08T22:01:27+5:30
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता ही ग्रामविकासाची गुरुकिल्ली होय. गावावरुन देशाची परिक्षा असे राष्ट्रसंतानी आपल्याला सांगितले आहे. ग्रामगीतेचा अभ्यास करुन ग्रामसेवा केली पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सासरा : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता ही ग्रामविकासाची गुरुकिल्ली होय. गावावरुन देशाची परिक्षा असे राष्ट्रसंतानी आपल्याला सांगितले आहे. ग्रामगीतेचा अभ्यास करुन ग्रामसेवा केली पाहिजे. गावात स्वच्छता, शांतता, आरोग्य, शिक्षण इ. नांदणे गरजेचे आहे. प्रत्येकाने कृतीप्रवण असले पाहिजे. आपल्या नंतरची पिढी सुसंस्कारीक कशी होईल यासाठी प्रयत्नरत असले पाहिजे. प्रयोगशीलता अंगी बाळगून राष्ट्रसंताच्या कल्पनेतला गाव निर्माण करावा असे प्रतिपादन अड्याळ टेकडी भुवैकुंठ आध्यात्मिक केंद्राचे उत्ताराधिकारी सुबोध दादा यांनी केले.
सासरा येथे आयोजित श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रबोधन विषयक कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रस्तुत कार्यक्रम ग्रामविकासासाठी जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गुरुदेव सेवा मंडळाचे बालसदस्य यांनी सामुदायिक प्रार्थना केली. यावेळी ग्रामवासीय व बाहेरुन आलेल्या मंडळींची लक्षणीये उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी महिला व समाजकल्याण सभापती रेखा वासनिक होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार बाळा काशीवार होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. देवराव भांडारकर, ह.भप. बिसराम नागरिकर, पं.स. सदस्य जनार्धन डोंगरवार, माजी उपसभापती लखण बर्वे, सरपंच शालिकराम खर्डेकर, रविंद्र खंडाळकर सरपंच विहिरगाव, केवलराम निखारे, राजू हेडाऊ, सुनील तंडण, विजय भोवते, श्रीरंग खोब्रागडे, तंमूस अध्यक्ष तुकाराम गोटेफोडे, उदाराम गोटेफोडे गुरुजी भू. वैंकुठ आध्यात्मिक केंद्रातील रेखाताई लक्ष्मीताई आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामविकासासाठी श्रमदान करणाऱ्या युवकांना ग्रामपंचायतच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी गावातील वयोवृध्द नागरिकांना ग्रामगीता देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे मंदिर परिसरात स्वच्छता ठेवणाऱ्या नागरिकांनाही ग्रामगीता देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी एच. एच. खंडाईत यांनी पार पाडले. संचालन माणिक खर्डेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्या. नाजुक बनकर यांनी पार पाडले. संचालन माणिक खर्डेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्या. नाजुक बनकर यांनी पार पाडले.कार्यक्रमासाठी गिरधर गायधने, मधुकर गायधने, जगदीश पोवनकर, राजेंद्र गजभे, विनायक नंदरधने, मुकूल उमेश गायधने, हर्षद गायधने, दूधराम नागरीकर, चेतन गायधने, ऋृषी गायधने, शिरीष गायधने, नुपूर गायधने, रोशन गजभे, वैभव गायधने, दीपा गायधने, स्मित गायधने, वैष्णवी राऊत यांनी सहकार्य केले.