'कनेक्टिव्हिटी'च्या गोंधळामुळे ग्रा.पं. उमेदवारी टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:51 PM2017-09-29T23:51:50+5:302017-09-29T23:52:02+5:30
होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय आखाडा सज्ज झाला आहे. मात्र, आता आॅनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत सर्व्हर वारंवार हँग होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय आखाडा सज्ज झाला आहे. मात्र, आता आॅनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत सर्व्हर वारंवार हँग होत आहे. कनेक्टिव्हिटी गायब होत असल्यामुळे उडालेल्या गोंधळाने निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांची उमेदवारी टांगणीला लागली आहे.
७७ ग्रामपंचायतसाठी होणाºया निवडणुकीसाठी २२ ते २९ डिसेंबर अर्ज दाखल करायचे आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू असताना नेट संजीवनी मिळत नसल्याने उमेदवारांना कोमात जाण्याची वेळ आली आहे. जेव्हा पाहावे तेव्हा सर्व्हर डाऊन, कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातून उमेदवारी अर्ज भरण्यास झालेल्या उमेदवारांना कनेक्टिव्हिटी मिळेपर्यंत अख्खी रात्र जागून काढावी लागत असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत आहे. तरीही अतीउत्सुक उमेदवारांनी ७७ ग्रामपंचायतच्या सदस्य पदाकरिता केवळ १०७ अर्ज तर सरपंच पदाकरिता २१९ असे १,२८९ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपद नगराध्यक्षपदाप्रमाणे थेट जनतेतून निवडून देणार असल्याने तसेच सरपंचपदाला महत्व आल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीला राजकीय क्रेझ आली आहे.
थेट सरपंच होण्याची संधी लोकांतून मिळणार असल्याने दिवसागणिक गावागावातील राजकीय समीकरणेही बदलू लागली आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे तालुक्यातील बºयाच उमेदवारांनी शहरात तळ ठोकून कनेक्टिव्हिटी अभावी कसे बसे आॅनलाईन अर्ज टाकले तो उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याकरिता सकाळपासूनच उमेदवार रांगेत उभे होऊन उमेदवारी अर्ज दाखल करून सुटकेचा विश्वास घेतला आहे.
तर अनेकांनी किचकट प्रकाराला कंटाळून उमेदवारी अर्ज न भरलेले बरे म्हणून अनेक उमेदवारांची निराशा झाली आहे.