खोट्या स्वाक्षरीने अनुदानाचा लाभ
By admin | Published: July 13, 2016 12:43 AM2016-07-13T00:43:10+5:302016-07-13T00:43:10+5:30
लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी (येडगाव) येथील सुधाकर कुंडलीक मेश्राम याने गावातीलच अनमोल तिरपुडे यांची खोटी ...
सालेबर्डी येथील प्रकार : साकोली पंचायत समितीअंतर्गत घटना, कारवाईची मागणी
दिघोरी (मोठी) : लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी (येडगाव) येथील सुधाकर कुंडलीक मेश्राम याने गावातीलच अनमोल तिरपुडे यांची खोटी स्वाक्षरी करून विशेष घटक योजनेअंतर्गत लाभ घेतला. याबाबतचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोषीवंर कारवाई करण्याची मागणी शिवसेना शाखा प्रमुख अविनाश तिरपुडे व अनमोल तिरपुडे यांनी केली आहे.
सालेबर्डी येडगाव येथील गट क्रमांक १०३, वर्ग २, ०.७५ आराजी हेक्टर शेतजमीन असलेल्या शेतजमिनीचे दोन समान हिस्से झालेले आहेत. यामध्ये एका हिस्स्यात रत्नघोष पुंडलीक मेश्राम, सुधाकर पुंडलीक मेश्राम, प्रेमलता प्रकाश बोंबार्डे ही नावे आहेत तर दुसऱ्या हिस्स्यामध्ये अनमोल अशोक तिरपुडे यांची नावे आहेत. गाव नमुना सातवर या चारही व्यक्तीचे नावे असून या चारपैकी कुणालाही गाव नमुना सात काढायचे असल्यास चौघांची नावे त्यात नमुद असतात. त्यामुळे शासकीय किंवा निमशासकीय कामासाठी जर गाव नमुना सात विविध योजनांसाठी लागत असल्यास त्यात नमूद असलेल्या सर्वांची संमत्तीपत्रावर स्वाक्षरी घेणे बंधनकारक असते. मात्र सुधाकर मेश्राम यांनी पंचायत समिती साकोली अंतर्गत विशेष घटक योजनेच्या बैलबंडी व बैलजोडीच्या अनुदानाद्वारे लाभ घेतला. परंतु, गावनमुना सात मधील समान हिस्सेवारी असलेल्या अनमोल अशोक तिरपुडे यांना विश्वासात न घेता सुधाकर मेश्राम यांनी खोटी स्वाक्षरी कसे खोट्या व्यक्तीच्या नावावर सेतू केंद्रात हलफनामा तयार केला. त्यामुळे शासनाची व अनमोल तिरपुडे यांची फसवणूक करून अनुदान लाटले. याची पंचायत समिती व पोलीस ठाणे मार्फत चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व चुकीच्या मार्गाने मिळविलेले अनुदान परत करण्यात यावे, अशी मागणी साकोली तालुका शिवसेना शाखा प्रमुख अविनाश तिरपुडे व अनमोल तिरपुडे यांनी केले. (वार्ताहर)