जुमदेवबाबांच्या जयघोषात मोठी ताकद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:35 AM2021-03-05T04:35:06+5:302021-03-05T04:35:06+5:30
तालुक्यातील खमारी (बुटी) येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने आयोजित सेवक संमेलनात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. संमेलनाचे ...
तालुक्यातील खमारी (बुटी) येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने आयोजित सेवक संमेलनात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन मार्गदर्शक फुलचंद मारवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून क्रिष्णा बांते, जागेश्वर बोंद्रे, सरपंच क्रिष्णा शेंडे, राधेश्याम राघोर्ते, ग्रामपंचायत सदस्य रजनीस बन्सोड, सुकराम रोटके, झिबल ठवकर, मार्गदर्शक गोविंदा मोटघरे, लक्ष्मण मोहरकर, सोनू शेंडे, मोहतुरे, गंगाराम बुराडे, कुंडलिक भेदे, गुरुदास पंचबुद्धे, रमेश बांडेबुचे उपस्थित होते.
दरम्यान, खमारी येथील सेवकांनी महान त्यागी बाबा जुमदेवजी ग्रामस्वच्छता अभियान राबविले. तसेच भवनात सामूहिक हवनकार्य करण्यात आले. गावात शोभायात्रा काढण्यात आले. या दरम्यान ठिकठिकाणी सरबत तसेच नाश्ता, बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी बाबा जुमदेवजी यांच्या घोषणांनी गाव दुमदुमले होते. मानव जागृतीवर चर्चासत्र व मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी महिला व विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. संचालन महेश शेंडे यांनी केले. आभार किशोर ठवकर यांनी मानले.
संमेलनासाठी उत्तम ठवकर, प्रभू शेंडे, समरित, संदीप फेंडर, किसन ठवकर, राजू बोरकर, शंकर आग्रे, अविनाश शेंडे, ठवकर, एकराज माटे, मेश्राम, समरित, मारवाडे तसेच खमारी येथील परमात्मा एक सेवकांनी सहकार्य केले. रात्रीला जनजागृतीसाठी परमपूज्य परमात्मा एक भजन व कलापथक मंडळांनी भजनाचा कार्यक्रम सादरीकरण केला होता.