ग्रीनफ्रेड्सने काढली ‘ग्रीन सायकल संदेश रॅली’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:36 PM2018-10-12T22:36:33+5:302018-10-12T22:37:05+5:30
येथील ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब व अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती तालुका शाखा लाखनी तर्फे लाखनी ते गडेगाव व परत लाखनी अशी १४ किमी ग्रीन सायकल संदेश रॅली वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : येथील ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब व अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती तालुका शाखा लाखनी तर्फे लाखनी ते गडेगाव व परत लाखनी अशी १४ किमी ग्रीन सायकल संदेश रॅली वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने काढण्यात आली.
ग्रीनफ्रेंडस नेचर क्लबचे व अखील भारतीय अंनिसचे तालुका पदाधिकारी व ग्रीनफ्रेंडस सदस्य, नागरिक हिरवी टी शर्ट तसेच हिरवे संदेश बॅनर हातामध्ये घेत लाखनी पोलीस ठाण्याला सायकलीने हजर झाले. यावेळी ग्रीनफ्रेंडसचे कार्यवाह तसेच अभा अनिसचे जिल्हा उपाध्यक्ष व लाखनी तालुका अनिस संघटक प्रा. अशोक गायधने, सिध्दार्थ विद्यालय सावरीचे हरित सेना शिक्षक तसेच ग्रीनफ्रेंडस व तालुका अनिसचे पदाधिकारी दिलीप भैसारे, ग्रीनफ्रेंडसचे व तालुका अंनिसचे अध्यक्ष अशोक वैद्य, निसर्गमित्र शुभम बघेल, आदित्य शहारे, युवराज बोबडे तसेच नितीन पटले, रितीक पडोळे व रोहीत पचारे यांनी सर्व उपस्थित सिध्दार्थ विद्यालय सावरीच्या हरित सेना विद्यार्थ्यांना ग्रीन सायकल संदेश रॅलीचे महत्व, आगामी दसरा- दिवाळीच्या मोठ्या प्रमाणावर फोडले जाणारे फटाखे व होणारे प्रदुषण, वन्यप्राणी शिकार, जंगलतोड, पर्यावरणाच्या घोषणाविषयी माहिती दिली.
त्यानंतर ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब तर्फे प्रत्येकाला हिरवी टी शर्ट व तसेच फटाखे फोडू नकाचे हिरवे संदेश त्याचबरोबर वन्यजीव जागृती संदेश सायकलवर देण्यात आले. संपुर्ण परिसर हिरव्या टी-शर्ट, हिरवे बॅनवर व स्टकर्स संदेश फलकमुळे हिरवामय झाला होता.
ग्रीन सायकल संदेश रॅली ला हिरवी झेंडी हवालदार राकेश हेमके, गोपाल कोसरे व शिपाई राजेंद्र लांबट यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ग्रीन सायकल संदेश रॅली’ फटाके फोडू नका, वन्यप्राणी शिकार करु नका, जंगलतोड करु नका, वाघ वाचवा पर्यावरण वाचवा चा संदेश व घोषणा देत गडेगाव वनविभाग लाकुड आगार येथे पोहोचली. याठिकाणी वनपाल वाय. एन. साठवणे व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.
रॅलीकरिता प्राचार्य धनंजय तिरपुडे, यश आगलावे, नितीन घनमारे, कुणाल टिचकुले, मिलिंद निर्वाण, अभय वलके, साहित्य बुराडे, दर्शन साखरवाडे, रजत चाचेरे, नितेश रंगारी, अंशू जांभुळकर, कार्तिक बुराडे, राहुल मेश्राम, अफरोज अन्सारी, सुमित गिऱ्हेपुंजे, पंकज देशमुख, आंकार चाचेरे, दुर्गेश मोहनकर, साहिल बावनकुळे आदींनी सहकार्य केले.