ग्रीनफ्रेंड्सतर्फे अभिनव अशी ‘पर्यावरणस्नेही पतंग बनवा स्पर्धा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:29 AM2021-01-15T04:29:24+5:302021-01-15T04:29:24+5:30
लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे मकरसंक्रांतीनिमित्ताने पतंग उडविताना मांजा-नायलॉन धाग्याचा वापर करून हजारो लाखो पक्ष्यांच्या जिवाला ...
लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे मकरसंक्रांतीनिमित्ताने पतंग उडविताना मांजा-नायलॉन धाग्याचा वापर करून हजारो लाखो पक्ष्यांच्या जिवाला दरवर्षी भारतात धोका निर्माण होतो. व लक्षावधी पक्षी तसेच प्राणी सुद्धा मृत्युमुखी पडतात.अनेक पायी चालणारे तसेच गाडी चालविणारे व्यक्तींना सुद्धा गळा चिरून गंभीर धोका निर्माण होतो. याबद्दल जागृती करण्याकरिता अभिनव अशी "पर्यावरणस्नेही पतंग बनवा" स्पर्धांचे आयोजन लाखनी बसस्थानकावर करण्यात आले. यावेळी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे सचिव प्रा.अशोक गायधने यांनी केले. ग्रीनफ्रेंड्सच्या सदस्यांना महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेने राज्य शासनाकडे पाच वर्षांपूर्वी पतंग उडविताना मांजा व नायलॉन धाग्याचा वापरामुळे पक्षी कसे मृत्युमुखी पडत आहेत. याबद्दल निवेदन देऊन मांजा धाग्यावर बंदी घालण्याबद्दल निवेदन दिले. शासनाने दखल घेत मागील तीन वर्षांपासून मांजा तसेच नायलॉन धाग्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे, याबद्दल माहिती दिली. तसेच पर्यावरणस्नेही मकरसंक्रांत सण साजरा करण्याकरिता इकोफ्रेंडली पतंग कसे बनवावे, मांजा नायलॉन धाग्याबद्दल जागृती संदेश कसे लिहावे याचे सुद्धा मार्गदर्शन अशोक वैद्य, गजानन गभने यांनी केले.
स्पर्धकांनी प्लॅस्टिक पतंगचा वापर न करता कागदी पंतगांचा वापर केला. "मांजा नायलॉन धागा वापरू नका ",पक्ष्यांना जीवदान द्या" "सेव्ह बर्डस -सेव्ह नेचर" "पक्षी आहेत-निसर्गाची नक्षी", "घेऊ द्या त्यांना मुक्त गगन भरारी" "मांज्याला घाला आळा व पक्षीमरण टाळा" " उडवा पतंग पर्यावरणस्नेही "असे विविध प्रकारचे आकर्षक जागृतीसंदेश लिहिले तसेच विविध पक्ष्यांचे चित्र सुध्दा त्यावर रंगवून चिपकविले.
तसेच मकरसंक्रांत निमित्ताने वाण म्हणून "वृक्षरोपे" वाटण्याचे आवाहन महिलावर्गांना ग्रीनफ्रेंड्सतर्फे करण्यात आले.
बॉक्स
पतंग बनाव स्पर्धा
इकोफ्रेंडली पतंग स्पर्धेत सीबीएसई गटातून प्रथम क्रमांक स्कायवर्ड स्कूलचा छविल विनोद रामटेके याला प्राप्त केला. द्वितीय क्रमांक एमडीएनफ्युचर स्कूलचा अर्णव अशोक गायधने याला प्राप्त झाला. हायस्कूल गटामधून समर्थ विद्यालयातून दीप कुलदीप रामटेके याला प्रथम क्रमांक कार्तिक सेलोकरला द्वितीय क्रमांक, आर्यन धरमसारे, हरीश सेलोकर यांना तृतीय क्रमांक, तर निखिल देशमुखला चतुर्थ क्रमांक प्राप्त झाला. मिडलस्कूल गटातून अमर कुलदीप रामटेकेला प्रथम, तर गौरेश महेश निर्वाणला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. सिद्धार्थ विद्यालयातून हायस्कूल गटात साहिल गणेश निर्वाणला प्रथम क्रमांक, तर ओंकार मंगल चाचेरेला द्वितीय क्रमांक प्राप्त केला. पंकज देशमुखला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. ज्युनिअर गटातून प्रथम क्रमांक आशिष खेडकर याला, तर द्वितीय क्रमांक राहुल नान्हे याला प्राप्त झाला. स्पर्धेचे परीक्षण ग्रीनफ्रेंड्स चे अशोक वैद्य, पंकज भिवगडे, गजानन गभने, योगेश वंजारी, दिलीप भैसारे, योगेश वंजारी व दिनकर कालेजवार यांनी केले.