ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ कात टाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 09:58 PM2018-07-03T21:58:44+5:302018-07-03T21:59:01+5:30
भंडारा जिल्ह्यातील एकमेव बंद असणाऱ्या ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. पावणे दोन कोटी रुपये खर्चाच्या विश्रामगृह बांधकामाचे भूमिपूजन पर्यटनस्थळात करण्यात आले असून येत् या काही दिवसात पर्यटनस्थळाचे विकास कार्यांना गती दिली जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : भंडारा जिल्ह्यातील एकमेव बंद असणाऱ्या ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. पावणे दोन कोटी रुपये खर्चाच्या विश्रामगृह बांधकामाचे भूमिपूजन पर्यटनस्थळात करण्यात आले असून येत् या काही दिवसात पर्यटनस्थळाचे विकास कार्यांना गती दिली जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.
सिहोरा परिसरात असणाºया ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळात मंजूर १ कोटी ८४ लाख रुपये स्वखर्चाच्या विश्रामगृह बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, पंचायत समिती सभापती रोशना नारनवरे, बंडू बनकर, तालुकाध्यक्ष राजेश पटले, अशोक पटले, सरपंच उर्मिला लांजे, मुन्ना फुंडे, रेखा नेवारे, देवानंद लंजे, हेमराज लंजे उपस्थित होते. आयोजित पर्यटनस्थळात विधीवत विकास कामाची पूजा अर्चना करणयत आली. यावेळी आ.वाघमारे पुढे म्हणाले, भंडारा जिल्ह्यात एकमेव पर्यटनस्थळ मंजूर आहे. या पर्यटनस्थळाला अपेक्षित ठेवण्यात आले असल्याने गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. या पर्यटनस्थळाला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नियंत्रणात हे पर्यटनस्थळ आता कात टाकणार आहे. पर्यटनस्थळात पावणेदोन कोटी रुपये खर्चाच्या विश्रामगृह बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. पर्यटनस्थळात विकासाचा हा ट्रेलर आहे. पूर्ण चित्रपट आता शिल्लक आहे. याच पर्यटनस्थळाचे शेजारी आराध्य दैवत हनुमान देवस्थान आहे. दर्शनासाठी भाविक येत असल्याने चुल्हाड ते चांदपूर रस्त्याचे नवीनीकरण करण्यात आले आहे. पर्यटन आणि देवस्थान असा सुरेख संगम असणाºया चांदपूर परिसराचा विकास करण्यास निधी कमी पडू दिले जाणार नाही. याशिवाय ७३ गावातील ४० हजार हून अधिक शेतकºयाने सोयीकरिता सिहोरा गावात मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण करण्यात आले आहे. शेतकºयांचे संपर्कात असणारे सर्व विभाग एकाच व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. निश्चितच शेतकºयांना याचा लाभ घेत आहे. सिहोरा परिसरात नद्या, निसर्ग व उद्यन्मुख केंद्र आहे. या परिसराला विकासाची जोड दिली पाहिजे. याच दिशेने प्रयत्न केले जात आहे. बपेरा गावात असणारा शासकीय व रिकामे इमारतीचे प्रश्न सोडविले जाणार आहेत. चांदपूर पर्यटनस्थळाचे विकास कार्यात निधीची कमी भासणार नाही. अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी परमानंद कटरे, डॉ.कारेमोरे, किशन नेवारे, राधेश्याम बनकर, ललेश पटले, कृणाल कुथे, रघुनाथ मिरासे, इसराम तितीरमारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन गोवर्धन शेंडे यांनी मानले.