ग्रीनफ्रेंडस्, अंनिसतर्फे खगोलदर्शन

By Admin | Published: November 8, 2016 12:41 AM2016-11-08T00:41:17+5:302016-11-08T00:41:17+5:30

ग्रीनफ्रेंडस् नेचर क्लब व अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा लाखनीच्या विद्यमाने रावणवाडी पर्यटन स्थळामध्ये ...

GreenFrends, Astronomers by Unknown | ग्रीनफ्रेंडस्, अंनिसतर्फे खगोलदर्शन

ग्रीनफ्रेंडस्, अंनिसतर्फे खगोलदर्शन

googlenewsNext

रावणवाडीत पाहणी : पर्यटनस्थळी टेलिस्कोपद्वारा ग्रह, नक्षत्रांचे दर्शन
लाखनी : ग्रीनफ्रेंडस् नेचर क्लब व अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा लाखनीच्या विद्यमाने रावणवाडी पर्यटन स्थळामध्ये चंद्राच्या उजेडात तलावाच्या काठावर खगोलदर्शन करण्यात आले. ग्रीनफ्रेंडस्चे संघटक प्रा. अशोक गायधने, ग्रीनफ्रेंडस्चे अशोक वैद्य, मंगेश चांगले, श्रीकांत कोटांगले, नाना वाघाये यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी अशोक गायधने खगोल दर्शनाद्वारे उपस्थित विविध विद्यार्थी, नेचर क्लबचे सदस्य व अंनिसच्या कार्यकर्त्यांना ग्रह, तारे, नक्षत्र, आकाशगंगा, रास, तेजोमेय याचा परिचय करून दिला. यामध्ये त्यांनी शर्मिका, ध्रृवतारा, ययाती, महाअश्व, अश्विनी, भरणी, अनुराधा, जेष्ठा, मुळ, विशाखा, कृतीका, मृग, व्याधतारा, नक्षत्र तसेच वृषभ, मीन, मेष, वृश्चिक, मकर, धनु, तुला, मिथुन आदी राशींचा व देवयानी अंड्रोमिडा गॅलक्सी, मिल्की व त्याचप्रमाणे विविध मेसियर व नेब्युला यांचा प्रत्यक्ष परिचय करून दिला. चांद्रबिंबा वरील विविध विकरे, काळे भाग, डोंगर, सावली, उल्का आघात तसेच शर्मिष्ठा नक्षत्रावरून धृव तारा देवयानी आकाशंगंगा तसेच त्यात असलेले ४०० अब्ज तारे याबद्दल माहिती दिली.
दुर्बिनीच्या सहायाने खगोल दर्शन करण्यात आले. निसर्गाच्या सानिध्यात रान पक्षी व प्राण्यांचे दर्शन खगोलप्रेमी, निसर्गप्रेमींना घडले. या कार्यक्रमात अंधश्रद्धा व गैरसमज दूर करून वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यात आला. कार्यक्रमात ग्रीनफ्रेंडस व अंनिसचे वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यात आला.
कार्यक्रमात ग्रीनफ्रेंडस् व अंनिसचे नितीन पटले, तुषार आगरे, रविंद्र पाखमोडे, राहुल चाचेरे, हेमंत बाभरे, रजत खवसकर, मुकूल खवसकर, अथर्व गायधने, अर्णव गायधने, संघदीप कोटांगले यांनी सहभाग नोंदविला. रजत खवसकर याने पर्यावरणपूरक भजन गायन करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. या उपक्रमाकरिता मंगेश चांगले, सतीश पटले, तेजस्विनी भगवान, डॉ. मनोज आगलावे, प्रा. अर्चना गायधने, सेवानिवृत्त कला शिक्षक दिनकर कालेजवार, सुमित्रा गायधने, लवकुश पांडे, अशोक वैद्य यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: GreenFrends, Astronomers by Unknown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.