आठवडाभर गावात फवारणी करून बाबासाहेबांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:35 AM2021-04-18T04:35:16+5:302021-04-18T04:35:16+5:30
लाखांदूर तालुक्यातील विरली गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील काहींना गृह विलगीकरणात, तर काहींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले ...
लाखांदूर तालुक्यातील विरली गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील काहींना गृह विलगीकरणात, तर काहींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनासह गाव प्रशासनाने गावात अनेक निर्बंध लावले आहेत. गाव प्रतिबंधित क्षेत्र देखील घोषित करण्यात आले.
अशातच डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी गावातील युवकांनी एकत्र येत सहारा फाउंडेशनच्या माध्यमातून आठवडाभर गावात सर्वत्र सॅनिटायझरची फवारणी करण्याचा निश्चय करून संकल्प पूर्ण केला.
त्यानुसार १४ एप्रिल रोजी विरली / बु येथील सहारा फाउंडेशनतर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आणखी पुढील एक आठवडाभर संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात येणार आहे. सदर उपक्रम पार पाडताना सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश महावाडे, उपाध्यक्ष गुणवंत काटेखाये, सहारा फाउंडेशनचे सदस्य राकेश दुनेदार, चेतन बगमारे, पराग काठाने, चंदू बगमारे, श्रीकांत पारधी, जयंत बेदरे, समीर राऊत, प्रशांत वकेकार, आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.