महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन
By admin | Published: November 29, 2015 01:37 AM2015-11-29T01:37:02+5:302015-11-29T01:37:02+5:30
१८ व्या शतकातील दीनदलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले ...
भंडारा : १८ व्या शतकातील दीनदलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हयात अभिवादन करण्यात आले.
लवारी येथे अभिवादन
लवारी : येथे महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माळी महासंघ व जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सुरेश नागरिकर, राम महाजण, महिला तालुका संघटनेच्या अध्यक्षा वर्षा इरले, राघोजी देशकर, हिरालाल किरणापुरे, गजानन किरणापुरे, ताराचंद कटनकार, वसंत इरले, यशवंत बेदवार, सहा. शिक्षक कावळे, खरवडे, शिक्षिका बोडेलकर, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. संचालन के. डी. अतकरी तर आभार अनिल भेंडारकर यांनी मानले.
माणिकराव विद्या. अशोकनगर
जवाहरनगर : मानिकराव सुखदेवे माध्यमिक विद्यालय अशोकनगर येथील कार्यक्रमाला सुनील घोल्लर, श्रावण चव्हाण, संध्या बाभरे, अपर्णा बागडे, काशिनाथ वाडीभस्मे, गजानन लिचडे, ईश्वरदास लाकडे, सुरेंद्र लिचडे, चंद्रशेखर डुंभरे, प्रतिभा जिभकाटे, आनंदराव डुंभरे, सुशीला निर्वाण, अनुराधा हुमणे, धनंजय सेलोकर, राजेश मेश्राम, देवाजी वाट आदी उपस्थित होते.
जि. प. शाळा निमगाव
पालांदूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव येथे अभिवादन करण्यात आले. वैभव सेलोटे, मुख्याध्यापक डमदेव कहालकर, योगेंद्र खंडाईत तसेच शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
जि.प. हायस्कूल, सरांडी
लाखांदूर : जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ कला महाविद्यालय सरांडी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही. बी. सिंदीमेश्राम हे होते. यावेळी शिक्षक कुंभारे, घोरमारे, ब्राह्मणकर, सातपुते, मेश्राम, मानकर, कटरे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
डोमळे विद्यालय, कुंभली
कुंभली : नारायणराव डोमळे विद्यालय कुंभली येथील कार्यक्रमाला मुख्याध्यापक एम. टी. लांडगे, एच. आर. कडसकर, डी. आर. बडवाईक, पी.पी. बावणे, बी. बी. बडवाईक, जे. आर. येरपुडे, सी. जी. ठाकरे, एस. डी. पराते उपस्थित होते. संचालन पी. आर. जवंजार यांनी केले.