विद्युत खांबाला टेकूचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:43 AM2018-04-18T01:43:05+5:302018-04-18T01:43:05+5:30
सातपुडा पर्वत रांगेच्या जंगलात असणाऱ्या आदिवासी सक्करधरा गावात वीज वितरण कंपनीच्या निष्क्रियतेमुळे जीवंत तुटलेल्या विद्युत खांबाला टेकू चा आधार देण्याची पाळी गावकऱ्यांवर आली आहे. या खांबाला दोराने बांधून ठेवण्यात आले असून गावकऱ्यांत भीती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सातपुडा पर्वत रांगेच्या जंगलात असणाऱ्या आदिवासी सक्करधरा गावात वीज वितरण कंपनीच्या निष्क्रियतेमुळे जीवंत तुटलेल्या विद्युत खांबाला टेकू चा आधार देण्याची पाळी गावकऱ्यांवर आली आहे. या खांबाला दोराने बांधून ठेवण्यात आले असून गावकऱ्यांत भीती आहे.
नाकाडोंगरी पंचायत समिती अंतर्गत समावेश असणाऱ्या धुटेरा गट ग्रामपंचायतच्या हद्दीत सक्करधरा गाव आहे. या आदिवासी गावाचा प्रशासकीय कारभार १८ कि.मी. अंतरावरून धुटेरा ग्रामपंचायत मधून करण्यात येत आहे. यामुळे गावात जलद गतीने विकास प्रभावित झाला आहे. या गावात समस्या आ वासून उभ्या आहे. गावातील प्रमुख मार्ग शेजारी असणारा जीवंत विद्युत खांब तुटला आहे. या खांबावरून गावात विजेचा प्रवाह सुरु आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या यंत्रणेने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. जीवंत विद्युत खांब तुटल्याने गावकऱ्यांनी संभावित धोका टाळण्यासाठी खांबाला टेकूचा आधार दिला आहे. या खांबाची कोसळण्याची भीती असल्याने गावकऱ्यांनी दोरा नी बांधून ठेवले आहे.
दोरी तुटल्यास गावात आपत्ती येण्याची शक्यता आहे. यामुळे गावकºयात भीती आहे. या खांबाला काही लाकडाचे टेकू लावण्यात आले आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी गोबरवाही वीज वितरण कंपनीचे कार्यालयात माहिती दिली आहे. परंतु दखल घेण्यात आले नाही. याच खांबाचे नजीक गावातील अंगणवाडी इमारत आहे. मैदानात मुले खेळत असल्याने अपघाताची शक्यता आहे. याशिवाय अंगणवाडी इमारत जीर्ण झाली आहे.
या अंगणवाडीत असुविधा असताना समस्या निकाली काढण्याचे प्रयत्न होत नाही. इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. लोकप्रतिनिधीचे या गावाचे विकास कार्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. गावात ३०५४ अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम मंजूर करण्यात आल आहे. या बांधकामाचे कंत्राट लोकप्रतिनिधींना आहे. गावात त्यांचे येणे जाणे असताना तुटलेल्या विद्युत खांबाकडे त्यांनी नजरेआड केले आहे. आदिवासी गावकऱ्यांना अज्ञानाचा फायदा घेण्यात येत आहे. सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट करण्यात येत असताना साधी चौकशी करण्यात येत नाही. गावात अनुशेष असताना पाणी समस्या सोडविण्यासाठी सौर पंप गृह मंजूर करण्यात येत नाही. यामुळे गावकरी कसरत करीत आहेत.
जीवंत तुटलेला विद्युत खांब बदलविण्यासाठी जलद गतीने कामे करण्यात येत आहेत. नवीन खांब लावण्यात येत आहे.
-ए.डी. पंधरे, शाखा अभियंता गोबरवाही
तुटलेला विद्युत खांब कडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. खांब कोसळण्याची भीती आहे. गावाला विकासात वाळीत टाकण्यात येत असल्याने अन्याय होत आहे.
-संजय सरोते, सदस्य ग्रा.पं. सक्करधरा