तंबाखुजन्य पदार्थ सेवनाचे दुष्परिणामावर गटचर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:35 AM2021-03-18T04:35:33+5:302021-03-18T04:35:33+5:30
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय देवगिरकर, क्रीडा संघटक शाहिद कुरैशी, बाळकृष्ण लंजे, विठ्ठल सुकारे यांनी उपस्थित डाॅ. मिथुल मिश्रा दंतशल्यचिकित्सक, ...
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय देवगिरकर, क्रीडा संघटक शाहिद कुरैशी, बाळकृष्ण लंजे, विठ्ठल सुकारे यांनी उपस्थित डाॅ. मिथुल मिश्रा दंतशल्यचिकित्सक, रिगन जांभुळकर समुपदेशक, डाॅ.जया कळमकर आयुष विभाग यांचे स्वागत केले. वर्ग ५ ते ८ चे एकूण विद्यार्थी १८७ यांची तपासणी करण्यात आली व समुपदेशन करण्यात आले. मुख तपासणी अंतर्गत डाॅ.मिश्रा व समुपदेशक डाॅ.कळमकर यांनी सांगितले की तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनामुळे जगभरात सुमारे ६० लाखांच्या आसपास लोक मृत्युमुखी पडतात. कोविड १९ च्या काळात मुखरोग, श्वास घेण्यास त्रास अशा अनेक व्याधींनी लोक त्रासले आहेत. यासाठी मुख व दंताची निगा राखा, व्यसनांना बळी पडू नका. एखाद्या सवयीच्या आहारी आपण गेलो म्हणजे आपल्याला व्यसन लागले असे समजावे. यासाठी आपल्याला निरोगी राहण्यासाठी व्यायामाची गरज आहे, असे प्रतिपादन डाॅ.मिश्रा यांनी केले. क्रीडा संघटक कुरैशी यांनी व्यायाम प्रकार सांगून विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व सांगितले.