शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:45 AM2018-02-02T00:45:34+5:302018-02-02T00:45:46+5:30

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ साकोलीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी एम.व्ही. कोरे यांना शिक्षकांच्या समस्यांचे निवेदन देवून चर्चा करण्यात आली.

Group of Teachers' Association Officials Discussion with Officials | शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

Next
ठळक मुद्देअखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ साकोली

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ साकोलीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी एम.व्ही. कोरे यांना शिक्षकांच्या समस्यांचे निवेदन देवून चर्चा करण्यात आली.
त्यात प्रामुख्याने वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रकरणे मंजुरीसाठी जिल्हा परिषदेला पाठविणे, प्रलंबित वैद्यकीय प्रतीपूर्ती बिल व इतर देयके निकाली काढणे, सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करणे, उच्च परीक्षेला बसण्याची परवानगी ताबडतोब मिळणे, सेवापुस्तीकेमध्ये गटविम्याच्या तसेच जीपीएफच्या नोंदी घेणे, सेवापुस्तीका अपडेट करण्यासाठी केंद्रनिहाय कॅप घेणे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नवीन जीपीएफ नंबर मिळण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदला पाठविणे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. सदर समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी यांनी दिले. मागण्यांची पुर्तता न झाल्यास येत्या काळात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला.
शिष्टमंडळात अध्यक्ष पी.टी. हातझाडे, सरचिटणीस बी.जी. भुते, के. डी. अतकरी, डी.डी. वलथरे, एच. के. लंजे, ए.सी. शहारे, डी.ए. थाटे, सी. सी. मेश्राम, एन.टी. गायधने, वाय.टी. हुकरे, एस.डी. भेंडारकर, एस.बी. ठाकरे, बी.के. मुंगमोडे, राजू रोकडे, एन.ई. रामटेके, सुरेश धकाते, आय. झेड. राणे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Group of Teachers' Association Officials Discussion with Officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.