सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 10:16 PM2018-04-25T22:16:56+5:302018-04-25T22:16:56+5:30
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या लाखांदूर तालुक्यातूनच सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरू झाली आहे. आपल्या देशात विवाह सोहळ्यांकरीता लाखो रूपयांची उधळण केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या लाखांदूर तालुक्यातूनच सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरू झाली आहे. आपल्या देशात विवाह सोहळ्यांकरीता लाखो रूपयांची उधळण केली जात आहे. त्यामुळेच तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेतून सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना मांडली. त्यांच्या विचारांशी एकरूप होऊन मागील १२ वर्षांपासून आपण विवाह सोहळ्याचे आयोजन करत आहोत. आर्थिक व सामाजिक विषमता संपविण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार तथा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
मोहरना येथे सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ओबिसी संग्राम परिषद व छावा संग्राम परिषद तथा नाना पटोले मित्र परीवार यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारला आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात २१ जोडपी विवाहबद्ध झाली. यात १५ जोडपी हिंदुधर्मीय, तर ६ जोडपी बौद्ध धर्मीय होती. जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर पाच हजार वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत वधू-वरांना आशीर्वाद देण्यात आले.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार नाना पटोले होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रदीप बुराडे, प्रणाली ठाकरे, शुद्धमता नंदागवळी, सरपंच प्रभाकर मेंढे, उपसरपंच बबन नागोसे, राँका जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष भुमेश्वर महावाडे, भागवत नाकाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वामन बेदरे, मनोज मेश्राम, संजय कोरे, पं.स. उपसभापती शिवाजी देशकर, रमेश भैय्या, प्रा.पि.एम. ठाकरे, न.पं. गटनेता रामचंद्र राऊत, पं.स. सदस्य वासुदेव तोंडरे, ईश्वर घोरमडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष राऊत, ताराचंद मातेरे, नगरसेवक निकेश दिवटे, तुलशिदास खरकाटे, अभियंता रमेश भेंडारकर, भाजपा उपाध्यक्ष विजय खरकाटे, निशांद लांजेवार, भाजपा महामंत्री पप्पु मातेरे, उत्तम भागडकर आदी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, समाजात पुरूष व महिला यांना समान हक्क देणे गरजेचे आहे. समाजात बलात्कारासारखा दुर्देवी व निंदनीय घटना घडत आहेत. त्यासाठी चांगले विचार व सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी बंडूभाऊ सावरबांधे यांनी युवकांना रोजगार नसल्याने प्रचंड बरोजगारी वाढल्याचे सांगून सामूहिक विवाह सोहळा आदर्श व स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी मुलींचा जन्मदर कमी झाल्याने मुलांना मुली मिळत नाहीत. त्यासाठी मुलीकडे सकारात्मक दृष्टीकोणाने पाहून स्त्री-भ्रूणहत्या थांबवावी. यावेळी जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे, माजी आमदार सेवक वाघाये, राँका जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
प्रारंभी बौद्ध धर्माच्या रितीप्रमाणे सहा जोडप्यांचे लग्न, त्यानंतर १५ हिंदू जोडप्यांचे लग्न यावेळी लावून देण्यात आले. छावा संग्राम परिषद व नाना पटोले मित्र परीवाराच्यावतीने वर-वधुंना एलईडी भेट देण्यात आली. त्यानंतर नाना पटोले यांनी २१ जोडप्यांचे पालकत्व स्विकारून कन्यादान केले. या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वऱ्हाडी मंडळींसाठी जेवण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
संचालन यशवंत नखाते यांनी केले. प्रास्ताविक नाना पिलारे यांनी केले. आभार रामचंद्र राऊत यांनी मानले. कार्यक्रमाकरिता सुभाष खिलवानी, राजु पालिवाल, मधुकर भोयर, प्रभाकर राऊत, विलास पिलारे, बबलु राऊत, मंगेश राऊत, मेहबुब पठान, फिरोज छवारे यांनी सहकार्य केले. यावेळी हजारो वऱ्हाडी सोहळ्यात सहभागी झाले होते.