तुमसरात डासांचा वाढता प्रभाव नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:42 AM2021-09-04T04:42:14+5:302021-09-04T04:42:14+5:30
तुमसर : तुमसर नगरपरिषदेंतर्गत शहरातील नाल्यावर सिमेंटचे कव्हर झाकून असल्यामुळे, नाल्यामधून पूर्णपणे उपसा व साफसफाई होत नाही. शहरात अस्वच्छता ...
तुमसर : तुमसर नगरपरिषदेंतर्गत शहरातील नाल्यावर सिमेंटचे कव्हर झाकून असल्यामुळे, नाल्यामधून पूर्णपणे उपसा व साफसफाई होत नाही. शहरात अस्वच्छता वाढल्याने डासांचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यू, मलेरिया रुग्णांत मोठी वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मच्छरमार फवारणी अनेक महिन्यांपासून करण्यात आली नसल्याने, याची दखल शिवसेनेने घेऊन मच्छरमार फवारणी करण्यासाठीचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, तसेच नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांना दिले आहे. नगरपरिषद क्षेत्रात नाली उपसा व साफसफाई अनियमित अव्यस्थित होत असल्याने मच्छरांचे प्रमाण वाढले आहे.
मच्छर वाढल्याने सामान्य जनतेला याचा फटका बसत आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे डेंग्यू, मलेरिया व इतर रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. येथील नागरिक त्रस्त असून, त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेने या प्रकरणी तत्काळ दखल घेऊन मच्छरमार फवारणी करण्याची मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, शाखा प्रमुख निखिल कटारे, अरुण डांगरे, तुषार लांजेवार, सतीश बन्सोड यांनी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. पत्राची प्रत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.