शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:17 AM2019-06-14T01:17:48+5:302019-06-14T01:18:12+5:30
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक नाबार्ड अर्थसहायक निधीतून गत तीन वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत. याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर येथे गुरूवार १३ जून रोजी पार पडलेल्या मार्गदर्शनपर खरीप सभेत विविध विषयांवर उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक नाबार्ड अर्थसहायक निधीतून गत तीन वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत. याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर येथे गुरूवार १३ जून रोजी पार पडलेल्या मार्गदर्शनपर खरीप सभेत विविध विषयांवर उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी मार्गदर्शन केले. शेतीपूरक व्यवसायासोबतच शेतमाल साठवणूक गोदामात माल ठेवल्यानंतर शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याचीही यावेही तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली.
भंडारा तालुक्यातील गणेशपूर प्रोडूसर कंपनीची सभा गणेशपूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये लाड यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा आढावा, पिकनिहाय लागवड, शेतकरी उत्पादक कंपनीसाठी असणारी आवाहने आणि त्यावरील उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली. जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकºयांनी गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांशी आपली भागीदारी वाढविल्यास शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल. तसेच शेतकरी गटांच्या सभासदांना व इतरही शासकीय योजनांसाठी मदत केली जाईल, असे सांगितले.
त्यानंतर पुढे बोलताना आत्माचे बी.टी.एम. सतीश वैरागडे यांनी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कवडीमोल भावात विक्री न करता कंपनीकडे असणाºया गोदामात धान्य ठेवल्यास मालाच्या ७० टक्के किंमत शेतकºयांना मिळू शकेल व शासनाच्या सबसीडीचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर चिखलीचे प्रगतशील शेतकरी तानाजी गायधने यांनी भाजीपाला उत्पादन आणि विक्रीसंदर्भात विस्तृत मार्गदर्शन करून तालुका स्तरावर शेतकºयांच्या गटनिमिर्ती विषयी मार्गदर्शन केले.
शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांचे अमूल्य योगदान असून शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर ही शेतकºयांसाठी कंपनीचे सभासद होवून एकत्र येत शेतकरी बांधवांना प्रगतीसाठी आवाहन केले.
यावेळी अनेक शेतकºयांनी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी आल्यापासून कृषी विभागाशी शेतकºयांचा असलेला सहभाग वाढवल्याचेही मनोगतात सांगितले. शेतकरी उत्पादक कंपनीच्या खरीप सभेसाठी भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड आत्माचे बीटीएम सतीश वैरागडे, संजय एकापुरे, प्रगतशील शेतकरी तानाजी गायधने, अनिल नौकरकर, निलेश गाढवे, देवानंद चौधरी, पवन कटणकर, हरेंद्र रहांगडाले, वापकोचे अधिकारी पंकज गिरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
गटशेती आणि शेतकरी उत्पादक संस्थेत शेतकºयांची संख्या वाढल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. समूह वाढल्याने शेतकऱ्यांचाच अधिक फायदा होतो. त्यासाठीच शेतकऱ्यांनी गटशेती आणि शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मिलिंद लाड यांनी केले.