ग्रामीण शिक्षा ते उच्च शिक्षा यावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:25+5:302021-06-01T04:26:25+5:30
भंडारा: जिल्ह्यातील यूथ फॉर सोशल जस्टिस या सामाजिक संघटनेच्यावतीने १ ते ५ जून यादरम्यान पाच दिवसीय ग्रामीण ...
भंडारा: जिल्ह्यातील यूथ फॉर सोशल जस्टिस या सामाजिक संघटनेच्यावतीने १ ते ५ जून यादरम्यान पाच दिवसीय ग्रामीण शिक्षण व उच्च शिक्षण डिजिटल मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पाच दिवसीय मालिकेत रोज रात्री ९ वाजता जगभरातील नामांकित ख्यातीप्राप्त वक्ते लाईव्ह येऊन शिक्षण विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
यात प्रामुख्याने नालंदा अकॅडमी वर्धाचे संचालक अनुप कुमार, कॅनडा या देशातून केतन टांगले, भंडारा येथून मुख्याध्यापक मुबारक अली सय्यद, फिनलंड या देशातून धनिका सावरकर तर बेंगलोरहून शुभम वनवे शिक्षणविषयक मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी तथा पालकांनी या डिजिटल मालिकेचा फेसबुकमधील ‘वाएसजे भंडारा’ या पेजवर जावून या डिजिटल मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आव्हान यूथ फॉर सोशल जस्टिस सामाजिक संघटनेचे योगेश शेंडे, प्रमोद केसलकर, सुधीर सार्वे, वैष्णवी खंगारे, राणी मराठे, वैष्णवी धांडे, सायली आदमने, फाल्गुनी भुरे, समीक्षा भोगे, स्वाती गणवीर, हितेश राखडे, चैतन्य कांबळे, पुष्पक पंचभाई, हर्षल भुरे, आदित्य जीभकाटे यांनी केले आहे.