रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:17 AM2021-01-24T04:17:18+5:302021-01-24T04:17:18+5:30

अड्याळ येथील प्रकाश महाविद्यालय येथे रस्ता सुरक्षा अभियानामधील एकूण १० सोनेरी नियमांचे पत्रकवाटप करण्यात आले. दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट ...

Guide students through the road safety week | रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Next

अड्याळ येथील प्रकाश महाविद्यालय येथे रस्ता सुरक्षा अभियानामधील एकूण १० सोनेरी नियमांचे पत्रकवाटप करण्यात आले. दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट व चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर अवश्य करावा. वेग मर्यादेपेक्षा अतिवेगात व मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. वाहन चालवताना लेन कटिंग करू नये. मोबाइल फोनचा वापर करू नये. धोकादायकरीत्या वाहन चालवू नये तसेच पादचाऱ्यांनी झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणाहून रस्ता ओलांडावा व वाहन चालविताना पादचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक कृष्णा साळुंखे व वाहतूक हवालदार एस.के. कोडवते यांनी दिली. यासह वाढते सायबर क्राइम यावरही यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी मंचकावर प्रकाश महाविद्यालयाचे अड्याळ आर.एन. शहारे, कृष्णा साळुंखे, एस.के. कोडवते उपस्थित होते. प्रास्ताविक बी.आर. नगराळे यांनी केले. संचालन बी.बी. येळेकर, तर आभार ए.एल. मुनिश्वर यांनी केले. कार्यक्रमासाठी डी.बी. देशकर, मोहन चेपे, संजय ब्राह्मणकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Guide students through the road safety week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.