देशी कट्ट्यासह गुंडास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:44 PM2018-07-18T23:44:38+5:302018-07-18T23:45:01+5:30

गोंदिया जिल्ह्यात अनेक गुन्हे शिरावर असलेला आणि वर्षभरापासून पसार असलेल्या कुख्यात गुंडास मंगळवारी रात्री देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या रेड पथकाने जिल्ह्यातील बेला येथे केली.

Gundas arrested with country-cuttings | देशी कट्ट्यासह गुंडास अटक

देशी कट्ट्यासह गुंडास अटक

Next
ठळक मुद्देदोन काडतूसे जप्त : पोलीस अधीक्षकांच्या रेड पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोंदिया जिल्ह्यात अनेक गुन्हे शिरावर असलेला आणि वर्षभरापासून पसार असलेल्या कुख्यात गुंडास मंगळवारी रात्री देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या रेड पथकाने जिल्ह्यातील बेला येथे केली.
शहेजाद उर्फ बंदे शब्बीर खान पठाण (२५) रा.रेल टोली, पाल चौक गोंदिया असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गोंदिया शहर, रामनगर, रावणवाडी आणि गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत अनेक गुन्हेगारी कारवायात बंदेचा सहभाग होता. त्याच्या शिरावर खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, अपहरण, खंडणी तसेच मौका आदी विविध गंभीर गुन्हे आहेत. गणी यांचा महत्वाचा सदस्य असलेला शहेजाद उर्फ बंदे याचा गोंदिया पोलीस एक वर्षापासून शोध घेत होते. या कालावधीत बंदे वेशांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी राहून पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान तो जिल्हा हद्दीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनात रेड पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आडोळे, अश्विनकुमार मेहर, रुपचंद जामगडे, प्रदीप डहारे, विनोद शिवणकर, धीरज पिदुरकर, सचिन गाढवे यांनी त्याचा माग काढला. तो आपल्यासोबत देशी कट्टा घेऊन बेला येथे नवनिर्माणाधिन ढाब्यावर लपून राहात असल्याचे आढळून आले. त्यावरून जिल्हा रेड पथक व शिघ्र कृती दलाने सापळा रचून मंगळवारी रात्री त्याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळून दोन जीवंत काडतुसेही जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Gundas arrested with country-cuttings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.