ईश्वरापेक्षा गुरूंचे स्थान मोठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:36 AM2021-07-28T04:36:33+5:302021-07-28T04:36:33+5:30
भंडारा : बालवयापासूनच मनुष्य आपले आई-वडील, गुरुजन, वडीलधारी व्यक्ती, तसेच समाजातून बरेच काही शिकत असतो. या सर्व क्षेत्रात त्याला ...
भंडारा : बालवयापासूनच मनुष्य आपले आई-वडील, गुरुजन, वडीलधारी व्यक्ती, तसेच समाजातून बरेच काही शिकत असतो. या सर्व क्षेत्रात त्याला अनेक गुरुजनांचा अनुभव प्राप्त होत असतो. सर्व क्षेत्रांत त्याला ज्ञान प्राप्त होत असल्याने ईश्वरापेक्षा गुरूंचे स्थान मोठे आहे, असे प्रतिपादन ज्योतिष विद्यालय भंडाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हितेंद्र सोरटे यांनी केले. येथील गणेश विद्यालयात आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात ते बोलत होते. सरस्वती मातेचे पूजन, दीपप्रज्वलन, नवग्रह स्तोत्र, गुरू समर्पण स्तुती पाठ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे गुरुवर्य डॉ. हितेंद्र सोरटे यांना गुरूदक्षिणा स्वरूप भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाची सूत्रसंचालन अतुल खोब्रागडे यांनी केले. या कार्यक्रमात राजेश करंडे, डॉ. रमेश उपलप, डॉ.मनीष खारा, लोकेश मोहबंसी, पवन हेडाऊ, डॉ. वनिता शहा, डॉ. अरुणा येडने, मंजूषा सोरटे, प्राजक्ता संगीतराव, गौरी कोतवाल, देवीदास लांजेवार व विद्यालयातील इतरही सदस्यगण उपस्थित होते. अल्पोहाराणे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.