वैनगंगेच्या पुलाला बसतात हादरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:37 PM2017-09-16T22:37:00+5:302017-09-16T22:37:33+5:30
तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर माडगी शिवारातील वैनगंगा नदीवर जूने पूल आहे.
मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर माडगी शिवारातील वैनगंगा नदीवर जूने पूल आहे. मागील ५२ वर्षापासून अविरत सेवा प्रदान करणाºया पुलावरील डांबरीकरण उखडले असून डांबराचे उंचवटे धोकादायक ठरले आहे. पुलाच्या खांबात बेरिंगची ग्रासिंग मागील २५ वर्षापासून करण्यात आले नाही. जड वाहनामुळे पूलाला हादरे बसत आहेत. अतिशय वर्दळीच्या पूलाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष आहे.
तुमसर-गोंदिया राज्य महामार्ग क्रमांक ३३५ वर माडगी शिवारात वैनगंगा नदीवर सुमारे ३५० मीटर लांब पूल तयार करण्यात आले होते. या पूलाला सुमारे ५२ वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. हा पूल सध्या धोकादायक ठरत आहे. पूलावरील पोचमार्गाचे डांमरीकरण ठिकठिकाणी उखडले आहे. त्यामुळे काही ठिकाणी डांबराचे ऊंचवटे तयार झाले आहेत. ते वाहनाकरिता धोकादायक ठरले आहे. दूचाकी स्वारांचा जीव येथे धोक्यात आहे. पावसाळ्यात पाणी येथून सरळ सिमेंट खांबात शिरते. त्यामुळे पुलाचे खांब कमकुवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूलावर अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचले राहते.
या पूलाच्या खालील खांबात बेअरिंंग आहेत. बेअरगिंमुळे पूलाला हादरे बसत नाही जड वाहन पूलावरून गेल्यावर पूलाला हादरे बसतात तथा आवाज येत आहे. मागील २५ वर्षापासून दुरूस्ती झालेली नाही. यामुळे पूलाचे आयुष्य कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर जड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. अदानी पॉवरचे तथा रेतीचे ट्रक येथून धावतात. क्षमतेपेक्षा जास्त साहित्य त्यात असते. पूलावरून हे वाहन जातानी पूलाला मोठे हादरे बसतात. पूलात मोठ्या प्रमाणात सध्या कंपन होणे सुरू झाले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी मोहाडी सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली. परंतु अजुनपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. अपघात घडल्यावर कारवाई होणार काय, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
पूलाच्या दुरूस्तीला सुमारे ४० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. मागील दोन वर्षापासून दुरूस्ती करण्यात येणार आहे, असे सांगितले जात आहे. एका महिन्यापुर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंत्यांनी या पूलाची पाहनी केली होती हे विशेष. येथे पूलाची लांबी जास्त आहे. नदीचे पात्र रूंद आहे. दरवर्षी पूलाची देखभाल करणे गरजेचे आहे.
अभियंता प्रभारीच
मोहाडी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपविभागीय अभियंता विजया सावरकर यांचे स्थानांतरण पवनी झाले आहे. सध्या त्यांच्याकडेच मोहाडी सार्वजनिक बांधकाम खात्याचा प्रभार दिला आहे. येथे नियमित उपविभागीय अभियंत्यांची नियुक्तीची गरज आहे
मागील दोन वर्षापासून पूलाला सतत हादरे बसत आहेत. पूलावरील डामरीकरण ठिकठिकाणी उखडले आहे. बेअरिंगचे ग्रिसींग अजुनपर्यंत करण्यात आले नाही. दररोज या पूलावरून हजारो ट्रक धावतात. सार्वजनिक बांधकाम विभाग येथे दुर्लक्ष करीत आहे. याप्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.
के.के. पंचबुद्धे, जि.प. सदस्य भंडारा.
माडगी पूलावरील प्रत्यक्ष कामाला दसºयानंतर सुरूवात होणार असून सुमारे ४७ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. मुख्य अभियंत्यांनी पूलाची पाहणी केली आहे. बेअरिंग रिपेअरींगची कामे केली जातील.
पी.एन. माथुरकर, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मोहाडी.