साकोली तालुक्यात गारपीट
By admin | Published: May 28, 2016 12:31 AM2016-05-28T00:31:34+5:302016-05-28T00:31:34+5:30
शुक्रवारी दुपारी अचानक तालुक्यात गारपीटसह वादळीवारा व पावसाने दमदार हजेरी लावली.
लाखो रुपयांचे नुकसान : वादळामुळे अनेक घरावरील छत कोसळले
साकोली : शुक्रवारी दुपारी अचानक तालुक्यात गारपीटसह वादळीवारा व पावसाने दमदार हजेरी लावली. हे वादळ एवढे जोरदार होते की, तालुक्यातील अनेक घरांचे छत उडाले तर फुटपाथवरील पानटपरी व छोटीमोठी दुकाने जमीनदोस्त झाली.
यात आकाश सुधाकर वाघाडे (१६) हा पानटपरीखाली दबल्याने गंभीर जखमी झाला. एवढेच नव्हे तर ठिकठिकाणी झाडे रस्त्यावर पडली. तर साकोली लाखांदूर व भंडारा मार्गही थोडावेळ बंद होता. या वादळामुळे तालुक्यात लाखो रुपयाचे नुकसान झाले.
जिल्ह्यातही दुपारी ३ वाजताच्या तप्त उन्ह असताना पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे उकाड्यात काही प्रमाणात घट झाली. मात्र वीज पुरवठा खंडित होण्याच्या वाढत्या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)