राष्ट्रवादी व भाजपात उमेदवारीवरून घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:56 PM2019-03-11T22:56:10+5:302019-03-11T22:56:31+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. रविवारी सायंकाळी निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यास विद्यमान खासदारांसह दोघांची नावे चर्चेत आहेत. तर भाजपाकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पोटनिवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपा तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे.

Hailing from NCP and BJP candidates | राष्ट्रवादी व भाजपात उमेदवारीवरून घमासान

राष्ट्रवादी व भाजपात उमेदवारीवरून घमासान

Next
ठळक मुद्देसंभ्रम कायम : भंडारा-गोंदियात राजकीय हालचालींना वेग

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. रविवारी सायंकाळी निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यास विद्यमान खासदारांसह दोघांची नावे चर्चेत आहेत. तर भाजपाकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पोटनिवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपा तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अद्यापर्यंत कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारी घोषित केली नाही. मात्र लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा पक्ष करतील. अद्यापपर्यंत नावे पुढे न आल्याने मतदारात संभ्रम असून इच्छूक आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचा दावा करित आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे राजकारण सध्या राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार नाना पटोले, विद्यमान खासदार मधुकर कुकडे, भाजपाचे आमदार डॉ. परिणय फुके, आमदार चरण वाघमारे यांच्या भोवती फिरत आहे. गत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे विजयी झाले. भाजपाचा येथे पराभव झाला. हा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला आहे. भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीने येथील लोकसभा निवडणूक प्रतिष्ठीत घेण्याची माहिती आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजून आपले पत्ते उघड केले नाहीत. ते निवडणूक लढविणार की नाही या बाबत उत्सूकता शिगेला पोहचली आहे. त्यातच विद्यमान खासदार मधुकर कुकडे दिल्लीला रवाना झाले आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसकडून वर्षा पटेल, विजय शिवणकर, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांची नावे चर्चेत आहे. आता कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते याकडे लक्ष लागले आहे. भाजपा तगड्या उमेदवाराच्या शोधात असून माजी खासदार शिशुपाल पटले, डॉ. खुशाल बोपचे, आमदार डॉ. परिणय फुके यांच्यासह भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, राजेंद्र पटले, संजय कुंभलकर यांची नावे चर्चेत आहेत.
भाजपा उमेदवाराच्या घोषणेची प्रतीक्षा
भाजपाच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीने लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपाने उमेदवारी घोषित केल्यानंतरच खासदार प्रफुल्ल पटेल आपले पत्ते उघड करणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्त्याकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर निवडणूक लढवावी याकरिता दबाव वाढत आहे. एकंदरीत भंडारा-गोंदिया मतदार संघात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. इतर पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. अवघ्या काही दिवसातच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार यात शंका नाही.

Web Title: Hailing from NCP and BJP candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.