गारपीट अवकाळी पावसाने उन्हाळी धानाची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:35 AM2021-05-13T04:35:23+5:302021-05-13T04:35:23+5:30
तुमसर तालुक्यातील बघेडा व चिंचोली परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपले. यावेळी गारपीटही झाली. या परिसरात वादळी पावसामुळे ...
तुमसर तालुक्यातील बघेडा व चिंचोली परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपले. यावेळी गारपीटही झाली. या परिसरात वादळी पावसामुळे लोंबीवर आलेला धान लोटला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सुमारे दीड ते दोन तास हा पाऊस सुरू होता.
शेतात पाणी जमा झाल्याने धान कापणीनंतर धानाच्या कडपा कुठे ठेवायचे असा, प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ग्रामीण भागातील बघेडा परिसरातील अनेक कौलारू घरांचे छत उडाले. नागरिकांचे मोठे नुकसान झाले. बघेडा येथील सुंदर ठाकूर यांच्या मालकीचा बैल वीज पडल्याने जागीच ठार झाला. अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.
महसूल प्रशासनाने अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचा व छत उडालेल्या घरांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश रहांगडाले यांनी केली आहे.