धानाची आवक निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 09:56 PM2017-12-27T21:56:10+5:302017-12-27T21:56:53+5:30
साकोली तालुक्यात मान्सूनचा हलरीपणाणे व रोगराईमुळे शेतकऱ्याला नापीकिचा फटका बसला.
शिवशंकर बावनकुळे ।
आॅनलाईन लोकमत
साकोली : साकोली तालुक्यात मान्सूनचा हलरीपणाणे व रोगराईमुळे शेतकऱ्याला नापीकिचा फटका बसला. परिणामस्वरूप आधारभूत धान खरेदी केंद्रावर मागच्या वर्षीच्या तुलनेत केंद्रावर धानाची आवक निम्यावर आली. १ कोटी ४६ लक्ष रूपयाची थकबाकी आहे.
साकोली येथे मागील ६० वर्षापासून धान संशोधन केंद्र कार्यरत आहे. केंद्राला रोगप्रतिबंधात्मक जात संधोशित करता आली नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. यावर्षी हजारो एकरातील धानाची फसल अनेक रोगामुळे शेतकऱ्याची हाती आलीच नाही. शेतकऱ्यांना लागवड खर्च सुद्धा मिळाला नाही. शासन व कृषी विभागाच्या दुर्लक्षित धोरण व नियोजनाचा अभावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर मागील वर्षी डिसेंबर पर्यंत ३८ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. यावर्षी २०१७ डिसेंबर पर्यंत २० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. डिसेंबरपर्यंत १ कोटी ४३ लाख रूपयाची शेतकऱ्याची थकबाकी आहे. शेतकरी केंद्रावर धानाचे पैसे केव्हा मिळणार याकरिता चकरा मारत आहेत.