सिहोरा येथे बँकेसमोर ग्राहकांची अर्धा किमी रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:00 AM2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:00:16+5:30
केंद्र शासनाने जनधन खात्यावर खातेदारांना आर्थिक मदत दिली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना बचत खात्यात निधी वळते करण्यात आल्याने त्यांनी बँकेत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. जनधन खातेदार, शेतकरी तथा निराधार योजनेची लाभार्थी यांनी एकाच वेळी बँकेत पैशाकरिता धाव घेतली असल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : गावाची प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावात बँकेत खातेदारांची वाढती गर्दी आहे. खातेदारांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे पोलिसांनी बजाविताच अर्धा किमी अंतरपर्यंत लांबच लांब रांगा तयार होत आहेत.
केंद्र शासनाने जनधन खात्यावर खातेदारांना आर्थिक मदत दिली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना बचत खात्यात निधी वळते करण्यात आल्याने त्यांनी बँकेत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. जनधन खातेदार, शेतकरी तथा निराधार योजनेची लाभार्थी यांनी एकाच वेळी बँकेत पैशाकरिता धाव घेतली असल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली आहे. सिहोरा गावात असणाऱ्या बँक ऑफ इंडिया, जिल्हा सहकारी बँकेत खातेदारांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी खातेदारांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना केल्या असता अर्धा किमी अंतर्गत लांबच लांब रांग तयार होत आहेत. दरम्यान बँकाची कालावधी कमी तासाचे असल्याने अनेक खातेदारांना माघारी परतावे लागत आहेत.
अल्प कालावधीत कामे पुर्ण करण्यासाठी बँकानी टोकन पध्दत सुरु केली असली तरी काही वेळेनंतर सोशल डिस्टन्सिंग पालन करताना कुणी दिसून येत नाही. बँकातील गर्दी टाळण्याकरिता व्यवसाय प्रतिनिधी नियुक्त करण्यात आली आहेत. याप्रतिनिधीकडे खातेदारांची झुंबड दिसून येत आहे.
एटीएमला सुरक्षा गार्डाची नियुक्ती नाही
कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबविण्याकरिता उपाययोजना सांगितले जात आहे. बँक ऑफ इंडिया शाखेअंतर्गत एटीएमची सोय करण्यात आली आहे. परंतु या एटीएममध्ये सुरक्षा गार्डाची नियुक्ती करण्यात आली नाही. एटीएममध्ये ग्राहकांची गर्दी होत असल्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरण्याची भीती नाकारता येत नाही. या एटीएमला सुरक्षा गार्डाची नियुक्ती करण्याची गरज असतांना दुर्लक्ष करण्यात आले आहे. गावात अनेक दुचाकी वाहनावर पोलिसांनी कारवाई केली आहे.