कोरोनाच्या संकटात भाजीपाल्याला अर्ध्यावरच दर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:36 AM2021-04-16T04:36:07+5:302021-04-16T04:36:07+5:30
पालांदूर : गत २० दिवसांपासून कोरोनाचे संकट अतिशय भयानक जाणवत आहे. प्रत्येक व्यक्ती जीव सांभाळण्याच्या प्रयत्नात असताना शेतकरी राजा ...
पालांदूर : गत २० दिवसांपासून कोरोनाचे संकट अतिशय भयानक जाणवत आहे. प्रत्येक व्यक्ती जीव सांभाळण्याच्या प्रयत्नात असताना शेतकरी राजा मात्र शेतात राबत आहे. घामाचा रक्त करीत सर्वांच्या भोजना करीता परिश्रम घेत आहे. परंतु त्याच्या घामाला अपेक्षित दाम मात्र मिळत नाही. भाजीपाल्यांचे दर बाजारपेठाअभावी अर्ध्यावरच आलेले आहे.
गतवर्षी सुद्धा या महिन्यात लाॅकडाऊन लागलेला होता. शेतकऱ्याचे आर्थिक अर्थव्यवस्थेची घडी पूर्णपणे विस्कळीत झालेली सर्वांनीच अनुभवलेली होते. तीच परिस्थिती तीच अगतिकता आजही शेतकऱ्याच्या नशिबी आलेली आहे. महागाईने कहर केलेला असताना शेतकऱ्याच्या मालाला मात्र भाव अपेक्षित मिळत नाही. बाजारपेठा बंद असल्याने छोट्या-मोठ्या गुजरी कोरोनाच्या दहशतीत सुरू आहेत. ग्राहक नसल्याने मालाला अपेक्षित मागणी नाही. त्यामुळे मिळेल तो भाव स्वीकारत शेतकरी राजा भाजीपाला पडक्या भावात विकत आहे.
लांब पल्ल्याची बाजारपेठा बंद असल्याने स्थानिक ठिकाणी भाजीपाल्याचे विक्री मंदावलेली आहे. शेतकऱ्याकडून कोरोनाचे संकट दूर करण्याकरिता रुग्णांना ताजा भाजीपाला पुरविला जातो. हिरव्या भाज्या सुद्धा अत्यल्प दरात विकल्या जात आहे.
कोट
नवरात्र उत्सवातही मागणी नाही. हिंदू संस्कृतीप्रमाणे नवरात्र उत्सव सुरू आहे. शाकाहारीत वाढ अपेक्षित आहे. तरीसुद्धा अर्थव्यवस्था खिळखिळी असल्याने भाजीपाल्याला अपेक्षित मागणी नाही.
मोहन लांजेवार, भाजीपाला उत्पादक, पालांदूर
मागणी कमी असल्याने दर पडलेले आहेत. बाजारपेठेत ग्राहकच कमी झाल्याने व्यवहारात स्पर्धा नाही. लांब पल्ल्याच्या किंवा मोठ्या बाजारपेठा प्रभावित झालेल्या आहेत. जसा ग्राहक मिळेल त्या पद्धतीत भाजीपाला विकून मोकळा होणे सुरू आहे. शेतकऱ्याच्या घामाला निश्चितच अपेक्षित दाम सध्या तरी दुर्लभ झाले आहे.
बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जी मंडी असोसिएशन, भंडारा